भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मोटार वाहनांची चोरी करणारे गुन्हेगार जेरबंद……. ०३ गुन्हयांची उकल करून ९५,००० रु. कि. चे ४ मोटार सायकल केल्या हस्तगत….भद्रकाली पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी….!
लाल दिवा : नाशिक शहरात मागील कालावधीत दाखल मोटार वाहनांच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन मालाविरूद्धचे गुन्हयांना प्रतिबंध करणेबाबत मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, मा.श्री.डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग, नाशिक शहरयांनी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने भद्रकाली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र पाटिल, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती तृप्ती सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि / सत्यवान पवार व अंमलदार यांनी भद्रकाली पोलीस ठाणेचे अभिलेखावरील मालमत्ते विरूध्दचे इतर गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने योजना आखून सदर गुन्हयांचा मानवी कौशल्याने तपास करून ३ गुन्हे उघडकिस आणुन ९५,०००/- एकूण किंमतीच्या ४ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
१) भद्रकाली पो.स्टे. गुरनं. १०/२०२४ भादंवि क. ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी बाबत पो. ह. संदिप शेळके, यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आरोपी नामे आकाश संजय बांडे, वय २५ वर्षे, रा-जुने नाशिक, भद्रकालीयास ताब्यात घेवुन त्याचे कडुन तपासात खालील नमुद २ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास हा पो. ह. नरेंद्र जाधव हे करीत आहेत.
२) भद्रकाली पो.स्टे. गुरनं. १८/२०२४ भादंवि क. ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी बाबत पो.ना. अविनाश जुंदरे, पो. शि. नितील भामरे यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आरोपी नामे गणेश रमेश पाटिल, रा-मिर्चि हॉटेल जवळ, आडगाव यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन तपासात खालील नमुद २ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास हा पो. ह. सतिष साळुंखे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीसउपआयुक्त परिमंडळ-१, मा. श्री. डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.गजेंद्र पाटिल, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती तृप्ती सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हे शोधपथकाचे सपोनि सत्यवान पवार, पोह/नरेंद्र जाधव, सतिष साळुंखे, संदिप शेळके, पोना / लक्ष्मण ढेपणे, अविनाश जुंदरे,महेशकुमार बोरसे, पोशि/नितीन भामरे, दया सोनावणे, निलेश विखे, सागर निकुंभ, धनंजय हासे, योगेश माळी, नारायण गवळी यांनी पार पाडली आहे.