भद्रकाली पोलिसांची विशेष कामगिरी : भिकारी महिलेकडून बाळाची सुटका….. नागरिकांनी केले भद्रकाली पोलिसांचे विशेष कौतुक….!

लाल दिवा-नाशिक,ता.२३ :- भद्रकाली ! भिक मागण्यासाठी मुलीचे अपहरण .. गजेंद्र पाटलांच्या.. सतर्कतेमुळे काही मिनिटातच बालिका आईच्या कुशीत

भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार व पथक हे पोलीस ठाणे हद्दीत आयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा अनुषंगाने भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत गस्ती करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोह नरेंद्र जाधव ,पोहसंदीप शेळके, पोना लक्ष्मण ठेपने, पोना महेशकुमार बोरसे यांना पिंपळ चौकात एक भिकारी महिला एक वर्षाच्या लहान बाळाला घेऊन आडोशाला भीक मागत उभी होती. तिच्या वर्णनावरून व तिच्या जवळ असलेला लहान बाळ हे तिचे नसल्याचा संशय आल्याने सदर महिलेला गुन्हे शोध पथकाने चौकशी केली असता ती उडवा उडवी ची उत्तरे देऊ लागली तसेच तिच्या ताब्यातील असलेले बाळ हे मुलगा असल्याचे सांगितले परंतु परंतु पथकाने पाहणी केली असता सदर बाळ हे मुलगा नसून मुलगी असल्याचे समजल्याने सदर महिलेने बाळ कुठून तरी पळून आणल्याचे समजले त्या अनुषंगाने तिच्याकडे कौशल्याने विचारपूस केली असता तिने असता सदर बाळ रामकुंड पंचवटी येथून सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पळविल्याचे सांगितले

सदरबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे माहिती घेतली असता त्यांनीही सदर दुजोरा दिला आहे सदर महिला व लहान बाळ यांना पुढील तपास कामी पंचवटी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे लहान बाळाचे नाव सोनू विकी कांबळे,वय 1 वर्षे, राहणार- बळी मंदिर चक्रधर नगर, जत्रा हॉटेल आडगाव, नाशिक

बाळ पळून नेणाऱ्या महिलेचे नाव सुनिता अशोक काळे 45 वर्ष राहणार नाशिक रोड रेल्वे स्टेशन असे आहे….

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!