विशेष पथक अंतर्गत ! मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करणा-या गुन्हेगारांना जेरबंद करुन ;३ लाख ७० रुपये किंमतीचा ७४ ग्रॅम वजनाचा एम.डी हस्तगत ….अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी…!
लाल दिवा-नाशिक,ता.२२:- मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साो, यांचे आदेशान्वये, नाशिक शहरात अवैध रित्या अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे इसमांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर पोलीस ठाणे, हददीतील हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे, दामोदर नगर पाथर्डी शिवार नाशिक येथे मिळालेल्या बातमी प्रमाणे १) निखील बाळु पगारे, वय २९ वर्षे रा. फ्लॅट नं ७, दादाज अपार्ट, विक्रीभवन समोर, पाथर्डीफाटा शिवार, नाशिक व २) कुणाल उर्फ घा-या संभाजी घोडेराव, वय- २२ वर्षे, रा एन ५१/एस.एफ. १५/१ भगवती चौक, उत्तमनगर, सिडको, नाशिक यांचे कडून १,००,०००/- रू किंमतीचा २० ग्रॅम वजनाचा एम.डी. (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता बेकायदेशिररित्या कब्जात बाळगतांना मिळून आल्याने त्यांचे विरोधात इंदिरा नगर गुरन ०१२/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २९ प्रमाणे दि. १७/०१/२०२४ रोजी रात्री १० :२५ वाजता गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली होती.
त्यानंतर सदर गुन्हयात पाहिजे आरोपी क्र. ०३ अनंत सर्जेराव जायभावे, वय ३० वर्षे, राह. फ्लॅट नं.७, स्वामी समर्थ नगर, जत्रा हॉटेल मागे, आडगाव, नाशिक यास ताब्यात घेवून त्याचेकडुन २,७०,००० रू.कि.चा ५४ ग्रॅम वजनाचा एम.डी. मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केला आहे. सदर गुन्हयात आरोपीतांचे आणखी साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साो, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे वपोनि/पंकज भालेराव, सपोनि / एच.बी. फड, सपोनि / एच के नागरे, सपोउनि / बेंडाळे, पोहवा /१४९७ भामरे, पोहवा/११८५ ताजणे, पोहवा / ४४५ गायकर, पोहवा /१७४९ डंबाळे, पोहवा/२७६ भालेराव, पोना/१३७१ कोल्हे, पोना/१५३३ दिघे, पोना/१६९७ आव्हाड, पोअं/२४३२ नांद्रे, पोअं/८६९ येवले पोअ/२४२५ सानप, पोअं/२४३३ बागडे, पोअ/२४०१ वडजे, मपोअं/२३६६ भड, सर्व नेम. विशेष पथक अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने, कामगिरी केली असून मा. पोलीस आयुक्त सो, संदिप कर्णिक यांनी टिमचे अभिनंदन केले आहे.