जेसीबीतून पुष्पवृष्टी करत….. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाशिक शहरात जंगी स्वागत….!!!!
लाल दिवा-नाशिक,ता .२२ :- शिवसेनेच्या महा अधिवेशनासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोमवारी नाशिक शहरात आगमन झाले. आगमन झाल्यानंतर जेल रोड छत्रपती चौक, येथे त्यांचे जेसीबी मधून पुष्पृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते भगूर येथे रवाना झाले. स्वागत प्रसंगी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत होते.
सोमवार व मंगळवार या दोन दिवशी उद्धव ठाकरे नाशिक मध्ये तळ ठोकून आहेत. काळाराम मंदिर दर्शन, रामकुंडावर महाआरती, सातपूर येथे राज्यातील पदाधिकाऱ्यांचे महाअधिवेशन व त्यानंतर मंगळवारी सायंकाळी अनंत कान्हेरे मैदानावर विराट अशा सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1