वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या विशेष पथकाची उत्कृष्ठ कामगिरी…म्हसरूळ पो. स्टे. च्या रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी विशेष पथकाच्या ताब्यात….!

लाल दिवा-नाशिक,ता.२०:-म्हसरूळ पोलीस स्टेशन गुन्हयातील हद्दपार इसम रितेश भाऊराहेब चव्हान हा चाणक्यपुरी सोसा. म्हसरूळ लिंक रोड, राऊ हॉटेलचे मागे, नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी गुप्त बातमीदारा मार्फत विशेष पथकातील पोलीस नाईक दत्तात्रेय चकोर पोलीस अंमलदार गणेश वडजे यांना मिळाली होती.

त्या अनुषंगाने विशेष पथकातील अंमलदार यांनी सापळा लावुन हद्दपार आरोपी रितेश भाऊसाहेब चव्हाण, वय २३ वर्षे, व्यवसाय सुखवस्तु, रा. वज्रमुद्रा अपा. रूम नं१०, सप्तरंग सोसा. मागे, पेठरोड, नाशिक यास चाणक्यपुरी सोसा. म्हसरूळ लिंक रोड, नाशिक येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपास व कारवाई कामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

 

सदरची कामगीरी संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त गुन्हे, सिताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पोलीस हवालदार किशोर रोकडे, पोलीस हवालदार भारत डंबाळे, पोलीस नाईक दत्तात्रेय चकोर, भुषण सोनवणे, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, स्वप्नील मुंद्रे, गणेश वडजे भगवान जाधव, चंद्रकांत बागडे यांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!