२५ हजाराची लाच घेताना ग्रामसेवक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात….!
लाल दिवा : ज्ञानेश्वर शांताराम शिंपी,वय ४२वर्षे , धंदा – नोकरी , ग्रामसेवक, सजा तळेगांव (अं), ता. जि.नाशिक लाचेची मागणी २५ हजाराची लाच स्विकारली -२५ हजाराची लाच मागणी व लाच स्विकारली दि.९ -फेब्रुवारी २४ लाचेचे कारण तक्रारदार यांचे मुलास तळेगांव (अं) येथील स्मशान भूमी संबंधी कामकाजाकरिता 996538 रुपयाचे कामकाज ग्रामपंचायत तळेगांव (अं) येथून मिळाले होते. त्यापैकी शासकीय फी कापून रुपये 7,47,700 रुपये त्यांच्या मुलास मिळाले होते. उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून, सदरची रक्कम अदा करण्याकरिता लोकसेवक यांनी दि,9 फेब्रुवारी२४ रोजी तक्रारदार यांचेकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून, सदर लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून
त्रबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कारवाई सापळा अधिकारी परशुराम कांबळे,
पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. नाशिक ,सापळा पथक पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी पोलीस नाईक विलास निकम ,मार्गदर्शक मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,मा. श्री. माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र,नाशिक
श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक
आरोपीचे सक्षम अधिकारी -मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.