पोलिस हवालदार गुलाब सोनार यांची एकाच दिवसात दुसरी जबरदस्त कामगिरी….नॉयलान मांजा 2,08,000 रु चा मुददेमाल जप्त…..!
लाल दिवा-नाशिक,ता,४ :-आज दिनांक ०४ जानेवारी रोजी पोलिस हवालदार गुलाब प्रभाकर सोनार, गुन्हेशाखा, युनिट-२,नाशिक शहर यांना मिळालेल्या गोपनिय बातमी अन्वये मा. पोलीस आयुक्त सो यांच्या कार्यालयाकडील मनाई क्रमांक कक्ष 10/ विशा/ 11(13)/ नायलॉन मांजा / मनाई आदेश / मनाई आदेश/७०३१/2023 नाशिक शहर दिनांक 23/12/2023 अन्वे दिनांक 26/12/2023 रोजीचे 00:01 वाजता पासून ते दिनांक 23/01/2024 च्या 01:00 वाजे पावेतो मनाई आदेश जारी असताना इसम नामे प्रितेश गणेश सोनवणे वय १९ वर्ष, रा.सुभाषरोड, कुंभारवाडा, भगुर याने सदर आदेशाचे उल्लंघन करून त्याचे जवळील २,००,०००/- रू कि.ची पल्सर मो.सा.क्र एम एच १५ जेपी २०९७ हिचे वरून ८,०००/ रुपये किमतीचे मोनोफिल गोल्ड नावाचे नायलॉन मांजाचे एकूण १० गट्टू प्रत्येकी किंमत ८०० रुपये हा विक्री करण्याकरीता लेव्हीट मार्केट समोर, देवळाली कॅम्प, नाशिक येथे आला असता त्यास पोउपनि/संदेश पाडवी, सपोउपनि/बाळु शेळके, पोहवा/७८२ गुलाब सोनार, पोहवा/१४०० शंकर काळे, पोहवा/४४७ प्रशांत वालझाडे यांनी सापळा कारवाई करून ताब्यात घेतले असुन
त्याचे कब्जातुन बंदी असलेला नॉयलान मांजा व पल्सर मो.सा असा एकुण २,०८,०००/- रू किचा मुददेमाल जप्त करून त्यास जप्त मुददेमालासह पुढील कार्यवाही साठी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे वर्ग केलेवरून गुरन ०४/2024 भादविक.188,34 सह पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 5, 15 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.