थर्टी फर्स्ट च्या पूर्वसंध्येला….. 18 लाख 32 हजार किमतीचे ….रॉयल चॅलेंज, मॅकडोवेल्स नंबर 1, ट्यूबर्ग बिअर, विदेशी मद्याचे एकूण 571 बॉक्स जप्त …स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची दमदार कामगिरी….!
लाल दिवा-नाशिक,ता३० : 31 डिसेंबर 2023 च्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशानुसार जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी विशेष पथकांची कारवाई सुरु आहे. दिनांक 28/12/ 2013 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार काही इसम एका बंद कंटेनर मध्ये विदेशी मद्याचा साठा भरून अवैधरित्या मुंबई आग्रा महामार्गाने जात असल्याची माहीती मिळाली होती.. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी 10 वा मैल परिसरात सापळा रचून नाशिक बाजूकडे जाणारा कंटेनर क्रं NL-01-N-7630 थांबविला..
सदर कंटेनर ची झडती घेतली असता त्यात रॉयल चॅलेंज, मॅकडोवेल्स नंबर 1, ट्यूबर्ग बिअर असे पंजाब राज्य उत्पादन असलेले विदेशी मद्याचे एकूण 571 बॉक्स असा एकूण 18 लाख 32 हजार 964 रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा मिळून आला. सदरचे विदेशी मद्य पंजाब राज्याव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये विक्री करण्यास मनाई असून देखील यातील इसम हे बनावट इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बिल तयार करून, शासनाचा महसूल चुकवून, शासनाची फसवणूक करून अवैधरित्या विदेशी मद्यसाठा कोठेतरी विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर रित्या वाहतूक करताना मिळून आल्याने कंटेनर मालक मोहन कनाराम लाल, रा दांतीवास, जिल्हा जालोर, राजस्थान व कंटेनर वरील पळून गेलेला चालक व त्याचे इतर साथीदार यांचे विरुद्ध ओझर पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 263/2023 कलम 420,465,471 भादवी, सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई, अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात विदेशी मद्याचा एकुण 18,32,964 रुपये चा अवैध मद्यसाठा व कंटेनर असा एकुण 38 लाख 32 हजार 964 चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील., सपोनि सागर कोते, सपोनि गणेश शिंदे., पोउपनिरीक्षक दत्ता कांभीरे, पो उपनिरीक्षक नाना शिरोळे, ASI शिवाजी ठोंबरे, पोहवा नवनाथ सानप, शांताराम घुगे, सतीश जगताप, मनोज सानप यांचे पथकाने कामगिरी केली आहे.