शाळा-कॉलेज परिसरात …. भाईगिरी करु पाहणाऱ्यावर गुंडा विरोधी पथकाची कारवाई …. नागरिकांनी केले स्वागत…!
लाल दिवा-नाशिक,ता.३०: नाशिक आयुक्तल मार्फत मा पोलीस आयुक्त सर यांनी नागरिकांसाठी दिलेल्या वॉट्सअप क्रमांक वर नागरिकांच्या आलेल्या तक्रारीचे आम्ही माहिती घेऊन त्यामध्ये गुंडा विरोधी पथक याच्याशी निगडित असलेली तक्रार कॉलेज परिसरात टवाळखोर इसम वर कारवाई करावी व गस्त करावी म्हणून नागरिकांनी तक्रार केली होती
त्यानुसार आम्ही मा पोलीस उप आयुक्त गुन्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी कॉलेज/शाळा परिसरात गस्त करून तेथील शिक्षक व वाचमन यांच्याकडून टवाळखोर इस्माची माहिती घेतली व सदर टवाळखोर यांना ताब्यात घेऊन पुन्हा कॉलेज परिसरात येऊ नये म्हणून समज देऊन त्याना सरकारवडा पोलीस ठाणे येथे आणून मपोका कलम 112/117 प्रमाणे कारवाई केली.
कॉलेज मधील शिक्षक व कर्मचारी यांना आम्ही भेटून त्यांना टवाळखोर इसम किंवा गुन्हेगार याच्या कडून काही अडचण असेल तर तात्काळ गुंडा पथकाला किंवा कंट्रोल ला माहिती देणे बाबत सांगितले आहे.
गंगापूर रोड परिसरातील खालील कॉलेज मध्ये कारवाई
- सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते व गुंडाविरोधी पथक
- 1)एच.पी.टी.कॉलेज,
- 2)गोखले एज्युकेशन सोसायटीचे देशपांडे – कुलकर्णी स्कूल,
- 3) व्ही.एन.नाईक कॉलेज, 4)केटीएचएम कॉलेज,
- 5)भोसला मिलिटरी स्कूल,
- 6)आर.वाय.के.कॉलेज.
- प्रतिक्रिया
आज दिनांक 30/12/2023 रोजी दुपारी 12.00वाजता आमच्या एच पी टी कॉलेज कॅम्पस मध्ये आपल्या कार्यालयाचे गुंडा विरोधी पथक श्री. मोहिते सर व श्री गुंजाळ सर तसेच त्यांची सहकारी टीम हे येऊन यांनी गुंडांना ताब्यात घेतले व यापुढे कोणाला काही तक्रार असल्यास संपर्क साधावा असे आवाहन केले. त्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत भविष्यात असेच सहकार्य मिळावे.
संजय येवलेकर
एस एम आर के महिला महाविद्यालय, नाशिक