वृद्ध महिलांवर पाळत ठेवुन सोन्याचे मंगळसुत्र चोरणारे दोन चोरटे जेरबंद ….चैन स्नॅचिंग करून पळून जाण्या-या चोरटयांना जागेवरच पकडण्याचा थरार…. दक्ष नागरिकांची पोलीस पथकास मदत ….दक्ष नागरिक व गंगापूर पोलीस ठाणेचे पथकाचे मा. पोलीस आयुक्ताकडून अभिनंदन…..!
लाल दिवा-नाशिक,ता.१२: मागील काही महिन्यांपासून गंगापूर व सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत बुलेट मोटार सायकल वरुन महिलांची चैन ग्नचिंग होण्याचे सत्र सुरु होते. सदर चोरटयांना तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते व त्याच दृष्टीने गंगापूर पोलीस ठाणे कडील पथकाकडून प्रयत्न सुरु होते.
दिनांक ०७ रोजी दुपारी ३.३० वा. चे सुमारास आकाशवाणी टॉवर भाजी मार्केट पग्मिरातुन सौ. माधुरी गणेश जाधव रा. महिरावणी हया भाजीपाला घेवुन जात असतांना पाठीमागुन आलेल्या बुलेट मोटार वरील दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन मोटार सायकलवर पळुन गेले. घटनास्थळावरील लोकांनी सदर प्रकार पाहून आरडाओरड केली असता सदर ठिकाणाहून मोटार सायकल वर जाणारे नागरिक निलेश सदाशिव बिरारी, वय ४१, रा. पंचवटी यांनी चोरटयांच्या मोटार सायकलचा पाठलाग केला. चोरटयांनी मोटार सायकल वेगाने घटनास्थळावरुन काढण्याच्या प्रयत्नात तोल जावून मोटार सायकलचा अपघात होवून दोन्ही चोरटे खाली पडून त्यांना दुखापत झाली. त्या ठिकाणी जवळच दुकानात मोटार सायकल चीरीचे अनुशंगाने सिसिटीव्ही फुटेज पाहत असलेले गंगापूर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाचे पोशि/१४३८ सोनु खाड़े हे सदरचा गोंधळ पाहून तात्काळ सदर ठिकाणी आले. पोलीस अंमलदार सोनु खाडे, नागरिक श्री निलेश बिर्गर, वय ४१, रा. इंद्रकुंड जाजुवाडी, पंचवटी, नाशिक व श्री किरण शिवाजी ताडगे, वय ३२ रा. मखमलाबाद अशांनी यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून व धाडसाने या पैकी एका चोरटयास ताब्यात घेतले. एक चोरटा झालेल्या गोंधळाचा फायदा घेवून सदर ठिकाणाहून पळून गेला. पोलीस अंमलदार सोनु खाडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोउनि मोतीलाल पाटील व पोह रविंद्र मोहिते, पोह महाले यांना बोलावून घेतले. जवळच गस्त करत असलेले पोउनि पाटील व पथक काही मिनिटात सदर ठिकाणी पोहोचले. त्यांनी पळून गेलेल्या चोरटयाबाबत माहिती घेवून आजबाजूच्या परिसरात अतिशय वेगाने शोध घेउन दुस-याही चोरट्यास ताब्यात घेतले. या चोरटयांच्या अंगझडतीत महिलेची साधारण १२ ग्रॅम सोन्याची अर्धी पोत मिळून आली. याबाबत गंगापुर पोलीस
ठाणेस । ३०१/२०२३ भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास पोउनि मोतीलाल पाटील हे करत आहेत. अटक आरोपींची नावे १) मयुर वसंत गायकवाड ग. अमर सहवाम, धर्माजी कॉलनी, नाशिक, २) पणु चंद्रबली चव्हाण, रा. माळी कॉलनी, श्रमिक नगर, मानपुर, नाशिक मध्या ग. गायत्री गं बंगलो. शिवाजीनगर, नाशिक अशी आहेत.
मदर आरोपीकडे गुन्हे शोध पथकाचे पोउपनि पाटील यांनी केलेल्या सखोल तपासात त्यांनी गंगापूर व मग्काग्वाडा पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वीही याप्रकारचे गुन्हे केल्याचे कबूल केले असून त्यानी गुन्हयातील चोरलेले मोने शिवाजीनगर येथील सराफ एस. के. ज्वेलर्स चे मालक मनोहर बाबुराव कुमावत यांना विकले असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व तपासामध्ये एकूण १२१ ग्रॅम सोने व एक बुलेट मोटार सायकल असा ७,२१,७०५/-रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात नाशिक शहर आयुक्तालयातील एकूण ०५ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले.
- उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे
सदर उत्कृष्ट कारवाई बाबत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर श्री. संदिप कर्णिक यांनी त्यांचे कार्यालयात बोलावून या चोरटयांना पकडयास मदत करण्यारे नागरिक श्री बिरारी व श्री. किरण शिवाजी तागडे तमंच गंगापूर पोलीस ठाणेच्या पथकाचे प्रशंसापत्र व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. मंदिप कर्णिक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण मांा, पालीम उपआयुक्त (परिमंडळ-१), मा. श्री सिध्देश्वर धुमाळ साो, सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली, गिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक एन.व्ही. पवार, मोतीलाल पावर, पांवा १०७८ रविंद्र मोहित, पो.हवालदार गिरीष महाले, पो.हवालदार गणेश रहेंगे पो.नाईक मिनिदसिंग परदेशी, पो अंमलदार सोनु खाडे, पो.अमलदार मच्छिंद्र वाकचौरे, पो.अंमलदार तुषार मंडले, भागवन थविल, चालक पो.हवालदर उत्तमराव माळगावे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.उपनिरीशक मोतीलाल पाटील व पो अंमलदार तुषार मंडले करीत आहेत..