नाशिकरोडमध्ये ‘मौत’चा कारोबार! पाच लाखांचा ‘एमडी’ जप्त, तिघे बेड्यात

नाशिकरोडमध्ये पाच लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त, दोन भाऊ आणि पत्नीसह तिघे अटकेत

अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई: पाच लाखांचा एमडीसह तिघे अटकेत

लाल दिवा-नाशिक,दि.१४:-नाशिकरोडमध्ये अंमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) मोठी कारवाई करत पाच लाख रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणी दोन भाऊ आणि त्यांच्यापैकी एकाच्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. 

ही कारवाई एएनसी पथकाचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केली. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये फैसल शफिन शेख (२६), शिबान शफिन शेख (२५) आणि शिबानची पत्नी हिना शिबान शेख (२९) यांचा समावेश आहे. हे तिघेही नाशिकरोडमधील श्रीनाथ कृपा, माहेश्वरी भवन, आर्टिलरी सेंटर रोड येथील रहिवासी आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तिघेही पांढऱ्या रंगाच्या स्कोडा कारमधून नाशिकरोड बस स्थानकाजवळून जात असताना श्रद्धा हॉटेलजवळ त्यांना एएनसी पथकाने अडवले. कारची कसून झडती घेतली असता त्यामधून ९९.५ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज (मॅफेड्रॉन) सापडला. याची किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून, आरोपींकडून ड्रग्ज कुठून आणला होता आणि तो कुठे नेला जाणार होता याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांची साळस असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!