एमडी ड्रग्स “मोक्का” गुन्ह्यातील फरार असलेला सराईत १४ वा आरोपी जेरबंद…गुन्हे शाखा युनिट-१ ची हॅट्रिक….!
लाल दिवा-नाशिक,ता.१२: नाशिकरोड पोलीस स्टेशन गुरनं ४२५/२०२३ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २०(क), २९ प्रमाणे दि.०७/०९/२०२३ रोजी दाखल झाला होता, सदर गुन्हयात सुरवातीला आरोपीकडे १२.५ ग्रॅम एम.डी. हा अंमलीपदार्थ मिळून आला होता, पुढील तपासात आज पर्यंत सदर गुन्हयात १३ आरोपींना अटक करून सुमारे एम. डी. अंमलीपदार्थ एकुण ११ कोटी रूपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील आरोपी जे एम.डी. अंमली पदार्थ बनवित होते, ती सोलापुर येथील फॅक्टरी व गोडावुन सिल करण्यात आले आहे. सदर गुन्हा हा संघटीत गुन्हेगारीचा असल्याने मा. पोलीस आयुक्त सो. यांचे आदेशान्वये मोका कायदा लावण्यात आला आहे.
सदर गुन्हयात महत्वाचा सहभाग असलेला पाहीजे आरोपी नामे उमेश सुरेश वाघ हा ३ महीन्यापासुन फरार होता. तो फरार झाल्यापासुन बंगलोर, केरळ, हैदाबाद, आध्रप्रदेश, तामीळनाडु या ठिकाणी लपुन पळत होता. त्याचा गुन्हे शाखा युनीट १ व अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे विशेष पथक हे त्याचा सतत पाठलाग करत होते.
सदर आरोपी यास कोठल्याही परीस्थीतीत पकडण्याबाबत मा. पोलीस आयुक्त साो. संदीप कर्णीक साो. यांनी सुचना दिल्या होत्या, तसेच मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री बच्छाव साो. व मा.सपोआ डॉ. सिताराम कोल्हे साो. यांनी विशेष पथकाला मार्गदर्शन केले होते.
त्याच अनुषंघाने सदर आरोपीचा शोध घेत असतांना गुन्हे शाखा युनिट १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दि. ११/१२/२०२३ रात्री उशीरा माहीती मिळाली की, तो विरार जि. पालघर येथे लपला आहे, त्यावरून वपोनि / विजय ढमाळ यांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट १ चे सहा. पो.उप. निरी. रविंद्र बागुल, पो.हवा/१०९ प्रविण वाघमारे, पो. हवा/१३१६ नाझीमखान पठाण, पो.हवा/१८८३ विशाल काठे, पो.ना/१९०० विशाल देवरे, पो.ना/३७७ प्रशांत मरकड असा पथकास सुचना देवुन रवाना केले. सदर पथकाने पहाटे विरार येथे पोहचुन गोपनीय बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाव्दारे पाहीजे आरोपी उमेश सुरेश वाघ हा यशवंतनगर, म्हाडा बिल्डींग नं.१० प्लॅट नं. १६०५ विरार या ठिकाणी असल्याची माहीती मिळवुन त्यास कौशल्याने व शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याचे कब्जातुन एक मोबाईल व हयुडांई कंपनीची अल्काझार कार जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी सहा. पोलीस आयुक्त श्री. आनंदा वाघ यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर आरोपी नामे उमेश सुरेश वाघ रा. चुंचाळे, नाशिक हा या मोक्याच्या गुन्हयातील महत्वाचा आरोपी आहे, सदर आरोपीचा सोलापुरातील एम.डी. या अंमली पदार्थाची फॅक्टरी व गोडावुन निर्मीती करण्यामध्ये महत्वाचा सहभाग आहे. तसेच सदर आरोपी हा सोलापुरातुन नाशिक मध्ये सदरचा एम.डी. अंमलीपदार्थ गोपनीय रित्या स्पिकर बॉक्समध्ये ठेवुन वाहतुक करून आणुन सदर गुन्हयातील मुख्य आरोपी सनी पगारे याचेपर्यंत पोहचवित असे, त्यानंतर सनी पगारे त्याचे हस्तकामार्फत सदरचा एम. डी. अंमलीपदार्थ नाशिकमध्ये विक्री करत असे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि हेमंत तोडकर, सपोनि हेमंत फड, पोउनि/चेतन श्रीवंत, पोउपनि विष्णु उगले, पो.उप. निरी. रविंद्र बागुल, पो. हवा. प्रविण वाघमारे, पो. हवा. नाझीमखान पठाण, पो.हवा.विशाल काठे, पो.ना. विशाल देवरे, पो.ना. प्रशांत मरकड अशांनी केलेली आहे.