अरे बाप रे ! नाशिक शहरात २०२३ मध्ये एकुण ४२६ अपघात….. त्यात ३३९ दुचाकी अपघातात १०६ दुचाकीस्वार मयत….. २६९ दुचाकीस्वार जखमी…..१६ लाख २९ हजार २०० रुपये दंड वसूली….!
लाल दिवा-नाशिक,ता.१९ : मा. पोलीस आयुक्त साो. श्री संदीप कर्णिक, यांनी मा. पोलीस उपआयुक्त वाहतूक श्री. चंद्रकांत खांडवी व सहा. पोलीस आयुक्त, वाहतूक श्री. डॉ. सचिन बारी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या अपघातांच्या आढावा बैठकित नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील झालेल्या दुचाकी वाहनांचे अपघातांचा आढवा घेतला असता, जानेवारी २०२३ ते नोव्हें. २०२३ पावेतो नाशिक शहरात एकुण ४२६ अपघात झाले असुन त्यापैकी ३३९ दुचाकी वाहन चालकांचा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले असुन त्यामध्ये १०६ दुचाकीस्वार मयत झाले व २६९ दुचाकीस्वार जखमी झालेले आहेत.
नाशिक शहरात वाढणा-या रस्ते अपघातामध्ये होणारी प्राणहाणी टाळण्यासाठी दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट परीधान करणे अनिवार्य आहे तसेच वाहनांवर ट्रिपलसीट प्रवास करूनये याकरीता शहर वाहतुक शाखेतर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे परंतु विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याच्या प्रमाणात घट न होता दुचाकी स्वाराच्या अपघातात वाढ होवुन दुचाकी वाहनचालक मयत होण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसुन येते त्याकरीता शहर वाहतुक शाखेच्या अधिनस्त युनिट क. १ ते ४ च्या कार्यक्षेत्रात दिनांक ०७/१२/२०२३ ते दिनांक १५/१२/२०२३ पोवेतो विनाहेल्मेट वापराची व ट्रिपलसीट प्रवास न करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालय हददीत मा. पोलीस आयुक्त यांचे आदेशाने विनाहेल्मेट व ट्रिपलसीट मोहीम तसेच विरूध्द दिशेने वाहन चालविणे (राँग साईड ) राबविण्यात येवुन त्यामध्ये शहर वाहतुक शाखा युनिट क्र. १ ते ४ मध्ये विनाहेल्मेट-२२४४ इतक्या कारवाई करण्यात येवुन ११२२०००/-रु दंड, तसेच ट्रिपलसीट अन्वये २१५ केसेस करण्यात येवुन २१५००० /- रु दंड तसेच विरूध्द दिशेने वाहन चालविणे (राँग साईड) अन्वये ६१३ केसेस करण्यात येवुन ३०६५००/-रु असा एकुण ३०७२ केसेस करण्यात येवुन १६,२९,२००/-रू ऑनलाईन दंड आकारण्यात आलेला आहे.
तरी सर्व दुचाकी वाहन धारकांनी दुचाकी चालवितांना हेल्मेट परिधान करावे तसेच दुचाकी वाहनांवर ट्रिपलसीट प्रवास करू नये तसेच राँग साईड वाहन चालवु नये असे आव्हान नाशिक पोलीस आयुक्तालय, नाशिक यांचेकडुन करण्यात येत आहे.
डॉ. सचिन बारी सहायक पोलीस आयुक्त शहर वाहतूक विभाग नाशिक शहर