कर्जाच्या मोबदल्यात १.५ लाखांची लाच: शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वात २ अधिकाऱ्यांना अटक
नाशिकमध्ये कर्ज परतफेडीसाठी लाच घेणाऱ्या दोघांना अटक.
लाल दिवा-नाशिक,दि.३ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एका यशस्वी कारवाईत, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, जळगाव येथील दोन अधिकाऱ्यांना १,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
तक्रारदार, ४३ वर्षीय व्यक्ती, यांनी त्यांच्या आई व मोठ्या भावासोबत कर्जाबाबत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ACB कडे दाखल केली होती. तक्रारीनुसार, सोसायटीचे अधिकारी, चैतन्य नासरे आणि सुनील पाटील, यांनी तक्रारदाराच्या कर्जाच्या एकरकमी परतफेडीसाठी १,५०,००० रुपयांची लाच मागितली होती.
या माहितीच्या आधारे, ACB ने सापळा रचला आणि लाचेची रक्कम स्वीकारताना नासरे आणि पाटील यांना रंगेहाथ पकडले.
पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे आणि अमोल वालझाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.