विनयनगर परिसरात दगड व कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणारे जेरबंद गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी….!
लाल दिवा-नाशिक,ता.२०: मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त साो, नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे आदेशान्वये सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.
- दि.१८/१२/२०२३ रोजी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास विनयनगर भागातील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांच्या काचा अज्ञात इसमांनी दगड व कोयत्याने फोडुन दहशत निर्माण केली होती. त्यावरून मुंबईनाका पोलीस स्टेशन कडील । गुरनं ४७८/२०२३ भादविक ३३६,३३७, ४२७,३४ सह भा.ह.का कलम ४/२५ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने अज्ञात आरोपीतांचा गुन्हे शाखा युनिट क. १ चे पथक शोध घेत असतांना दि. १९/१२/२०२३ रोजी पोअं/२५४४ मुक्तार निहाल शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दगड व कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून नुकसान करणाऱ्या इसमांपैकी अरबाज उर्फ सोनु शफीक शेख, हा असुन तो चौकमंडई या ठिकाणी येणार आहे. सदरची माहीती पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांनी वपोनिरी श्री. विजय ढमाळ यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सी.एम. श्रीवंत, ASI सुगन साबरे पोहवा /९०० संदिप भांड, पोहवा १०९ प्रविण वाघमारे, पोहवा २३३ धनंजय शिंदे, पोना ३७७ प्रशांत मरकड, पोहवा/१८८३ विशाल काठे, पोअं/२५४४ मुक्तार शेख, पोअं/१४०५ आप्पा पानवळ, पोअं/२२७३ अमोल कोष्टी, पोअं २२६० जगेश्वर बोरसे अशांनी सदर ठिकाणी आलेल्या इसमास शिताफीने पकडून ताब्यात घेतले. सदर इसमाचे नांव अरबाज उर्फ सोनु शफीक शेख, वय-२६वर्षे, रा-मोठा राजवाडा काळे चौक, नाशिक असे सांगीतले. त्यास वरील गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे दोन विधीसंघर्षित बालत यांचेसह केल्याची कबुली दिली, त्यावर त्याचे इतर दोन साथिदार विधी संघर्षित बालक यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना व अरबाज उर्फ सोनु शफीक शेख यास पुढील कारवाईकामी मुंबईनाका पो. स्टे यांचे ताब्यात देण्यात आले आहे..
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, पोउपनि सी.एम. श्रीवंत, ASI सुगन साबरे ,पोहवा/९०० संदिप भांड, पोहवा १०९ प्रविण वाघमारे, पोहवा २३३ धनंजय शिंदे, पोना ३७७ प्रशांत मरकड, पोहवा / १८८३ विशाल काठे, पोअं/२५४४ मुक्तार शेख, पोअं/१४०५ आप्पा पानवळ, पोअं/२२७३ अमोल कोष्टी, पोअं २२६० जगेश्वर बोरसे अशांनी केलेली आहे……!..