नाशिक पोलिसांची दमदार कामगिरी……गुंडा विरोधी पथकाने इंस्टाग्रामवर धारधार घातक तलवार घेवुन दहशत पसरविणाऱ्या इसमास केले तलवार व गुप्तीसह जेरबंद…!
लाल दिवा-नाशिक,ता.९ : मा. श्री. संदीप कर्णीक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालय हद्यीत सराईत गुन्हेगार व हत्यार बाळगुन दहशत पसरविणारे गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्यासाठी गुंडा विरोधी पथकास आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), डॉ. श्री. सिताराम कोल्हे सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांनी अशा गुन्हेगारांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
दिनांक ०८/०१/२०२४ रोजी गुंडा विरोधी पथकातील अंमलदार पोना प्रदिप ठाकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इंस्टाग्राम अंकाउंटवर दिपक यादव नावाच्या व्यक्तीने दहशत निर्माण करण्यासाठी तलवार हातात घेवुन फोटो पोस्ट केला बाबत माहिती मिळाली. त्यावरुन सदर अंकाउंटवरील माहिती मिळवली असता सदर व्यक्ती ही अंबड सातपुर लिंकरोड वरील संजीव नगर परिसरातील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोर असलेल्या सनराईज रोलींग शटर या दुकानात मजुर म्हणुन काम करतो. त्यावरुन गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी पथकातील अंमलदार मलंग गुंजाळ, प्रदिप ठाकरे, मिलीन जगताप, गणेश भागवत व गणेश नागरे यांचेसह सदर ठिकाणी जावुन सदर इसम नामे दिपक रंगीलाल यादव वय-१९ वर्षे रा. सनराईज रोलींग शटर अंबड सातपुर लिंकरोड नाशिक मुळ रा. रामनगर बेइली, बस्ती, उत्तर प्रदेश यास ताब्यात घेतले असता त्याचे कडुन एक लोखंडी धारधार तलवार व एक लोखंडी गुप्ती ताब्यात घेण्यात आली आहे. नमुद इसमाने बेकायदेशीररित्या धारधार तलवार व गुप्ती हे हत्यार दहशत पसरविण्यासाठी, त्याचा वापर करण्यासाठी स्वत:जवळ बाळगुन मा. पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर यांचे कडील मनाई आदेशाचा भंग केला म्हणुन त्यांचे विरुध्द शस्त्र अधिनियमान्वये अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. संदीप कर्णीक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), डॉ.श्री. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सपोनि ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, दादाजी पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, मिलीन जगताप, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.
https://twitter.com/nashikpolice/status/1744713059380408802?t=r96CgMovam5MlK4S9t00og&s=19