भद्रकाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील ॲक्शन मोडवर……. चैन स्नॅचींग करणारे आरोपी पोलीसांच्या जाळयात…..“भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी”….!

लाल दिवा : नाशिक शहरात दाखल असलेले सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे करीता व आयुक्तालय हद्दीत प्रभावीपणे गस्त घालुन सोनसाखळी चोरांना प्रतिबंध करणेबाबत मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने मा.श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मा. डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, मा. श्री. गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती तृप्ती सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शना प्रमाणे गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि / सत्यवान पवार यांचे अधिपत्याखाली पोहवा /१८१० सतिश साळुंके व पथकातील इतर अंमलदार असे भद्रकाली पोलीस ठाणेकडील सोनसाखळी चोरीबाबत दि. ०४/०१/२०२४ रोजी दाखल गुन्हा रजि. नं. ०३/२०२४ भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे या गुन्हयाचा तांत्रिक पध्दतीने तपास करीत असतांना सदर गुन्हा हा बिडी कामगार नगर भागातील आरोपीतांनी केल्याबाबत गुन्हे शोध पथकास माहीती प्राप्त झाली.

 

पाहीजे आरोपींबाबत मिळालेल्या माहीतीचे अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे सपोनि / सत्यवान पवार व पथक यांनी आडगाव

 

पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा घडल्यापासुन दिवसरात्र सापळा रचुन आरोपी नामे १) ओंकार उर्फ दिपक वसंत शिंदे, वय २३ वर्षे, रा. घर

 

नं ५१७, बिडी कामगार नगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक २) रोशन सुधाकर कटारे, वय २३ वर्षे, रा. घर नं. २७, मालुबाईच्या

 

घराचे मागे, अमृतधाम, पंचवटी, नाशिक यांना दि. ०७/०१/२०२४ रोजी ताब्यात घेवुन अटक केली आहे. त्यांचेकडे सदर

 

गुन्हयाबाबत कसोशीने व कौशल्याने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदर गुन्हया

 

व्यतिरीक्त त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मागील तीन महिन्यांपुर्वी तपोवन रोडवर घडलेला चैन स्नॅचींगचा गुन्हा केला

 

असल्याचे देखील निष्पन्न झाले असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / सत्यवान पवार हे करीत आहेत.

सदर आरोपीतांकडुन नमुद गुन्हयासह भद्रकाली पोलीस ठाणेकडील सोनसाखळी चोरीबाबत खालील नमुद गुन्हा उघडकीस आला असुन सदर गुन्हयांमधील चोरीस गेलेला खालील वर्णनाचा मुद्देमाल व त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल

 

जप्त करण्यात आले आहे.

 

> उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमालाचे वर्णन खालीलप्रमाणे.

 

 

सदरची कामगिरी ही मा.श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मा. डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर, मा. श्री. गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती तृप्ती सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), भद्रकाली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि/सत्यवान पवार, पोना/१०१८ सतिष साळुंके, पोना / २४१ अविनाश जुद्रे, पोकॉ/२३७ नितीन भामरे, पोशि/१९८६ निलेश विखे, पोशि/२७२२ दयानंद सोनवणे, पोशि/१४६ नारायण गवळी पोशि/१५७७ सागर निकुंभ, पोशि/२७२७ धनंजय हासे अशांनी पार पाडली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!