नाशिक पोलिसांसह गोल्डन होरायझन स्कूलने ट्रॅफिक समस्यांवर ‘स्पीक फॉर नाशिक’ प्रकल्प २ सुरू केला

खांडवींनी फडकवला वाहतूक सुरक्षेचा झेंडा

लाल दिवा-नाशिक,दि‌.२२ – नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गोल्डन होरायझन स्कूलने नाशिक पोलिसांच्या सहकार्याने ‘स्पीक फॉर नाशिक’ प्रकल्प २ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नाशिक शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त श्री. चंद्रकांत खांडवी यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिनकर कदम, पोलीस हवालदार श्री. सचिन जाधव, शाळेचे अध्यक्ष श्री. संदीप गोयल आणि प्राचार्य श्रीमती शैला थॉमस उपस्थित होते.

‘स्पीक फॉर नाशिक’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशानंतर, हा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थी वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत. वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व, रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी शोधून त्यावर उपाय सुचवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

श्री. खांडवी यांनी आपल्या मार्गदर्शनात नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या जबाबदार आणि सहभागी भूमिकेमुळेच रस्ते वाहतूक सुरक्षित होऊ शकते.

या उपक्रमासाठी शाळेच्या श्रीमती सिमरन सुखवाणी, पल्लवी बागुल, हर्षिका दर्याणी आणि राखी पांडव यांनी विशेष प्रयत्न केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!