आ. नितेश राणे यांच्या मिरा रोडवरील “रोड शो” ने दिला करारा जवाब….. राम भक्तामध्ये एकच जल्लोष…..!
लाल दिवा : अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतात हिंदू बांधवांनी एकच जल्लोष केल्याचे वातावरण बघायला मिळाले. असेच काहीसे वातावरण मुंबईतील मीरा रोडवर देखील बघायला मिळाले होते. त्यावेळी काही राम भक्तांना मारहाण व गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. सदर प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
त्यामुळे रामभक्तामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी विचारसरणीचे आ. नितेश राणे यांनी यांनी सदर भागात आपल्या ताफ्यासह भेट दिली. त्यावेळी रस्त्यावर हजारोच्या संख्येने राम भक्त एकत्रीत झाल्याचे बघायला मिळाले. त्यावेळी प्रभू श्रीरामांचा जयघोष व जय भवानी जय शिवाजीचा घोषणा दिल्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. यावेळी आ. नितेश राणे यांनी दाखवलेल्या हिमतीचे सर्वांनीच तोंडभरून कौतुक केल्याचे बघायला मिळाले…
https://www.facebook.com/share/v/6y8LTNKzRfwwQYj7/?mibextid=qi2Omg