नाशिककरांनो, ‘सरकारचा आवाज’ बनण्याची सुवर्णसंधी! २१७२ पदांसाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ निवडीला धाव घ्या!

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात २१७२ जणांना रोजगार संधी

लाल दिवा-नाशिक, दि. ८ :-राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील तब्बल २१७२ उमेदवारांना योजनादूत म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे..

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या योजनादूतांना सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण करावा लागणार असून त्यासाठी त्यांना दरमहा १० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. 

प्रत्येक ग्रामपंचायतीत एक आणि शहरी भागात दर पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा प्रमाणात राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात १३८३ ग्रामपंचायती असून नाशिक आणि मालेगाव या दोन महानगरपालिकांव्यतिरिक्त मनमाड, येवला, नांदगाव, सटाणा, इगतपुरी, भगूर, त्र्यंबकेश्वर, चांदवड, सिन्नर या नगरपरिषदा आणि सहा नगरपंचायती आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून जवळपास २१७२ योजनादूत नियुक्त होण्याची शक्यता आहे. 

या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षे या गटात असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार पदवीधर असून त्यांच्याकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, संगणकाचे प्राथमिक ज्ञान, अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधार कार्डशी जोडलेले बँक खाते असणे बंधनकारक आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!