मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपी सह विधीसंघर्षित बालक ताब्यात ! काईम ब्रांच युनिट-२ चे मनोहर शिंदे धडाकेबाज कामगीरी ….!
लाल दिवा-नाशिक,ता.२९ :-नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणा-या मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंद करण्याचे दुष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणे बाबत पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी आदेश दिले होते.
(दि २८) एप्रिल२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क २ चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार गोरेवाडी शास्त्रीनगर येथे एक इसम त्याचे ताब्यात चोरीची काळया रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल बाळगुन घेवुन फिरत आहे बाबत खात्रीशिर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विदयासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपळा कारवाई करून इसम नामे १) जयेश केशव थोरात वय-१९ वर्ष रा. गोरेवाडी, शास्त्रीनगर, चंदन चाळ नाशिक यांस गोरेवाडी नाशिकरोड येथे हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल सह ताब्यात घेतले असता त्याचेकडे विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार २) सुजल गणेश जाधव वय-१९ वर्ष रा. खेडगाव ता. दिंडोरी जि. नाशिक व एक विधीसंघर्षीत बालक अशांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या दिवशी जमलेल्या गर्दिचा फायदा घेवुन सदर मोटारसायकल नाशिकरोड व्यापारी बॅक समोरून चोरी केल्याचे सांगीतले. त्याबाबत अधिक महिती घेतली असता नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे सदर गाडी चोरी गेले बाबत इंदल चुनीलाल बहोत वय-५०वर्ष रा. संस्कुती पार्क जेलरोड नाशिकरोड यांनी तक्रार दिली होती सदर गाडी त्यांना दाखवीली असता त्यांनी पोलीसांचे मनापासुन आभार व्यक्त करून पोलीसांचे कौतुक देखील केले सदर आरोपी व मुददेमाल नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विदयासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोहवा परमेश्वर दराडे, पोहवा वाल्मीक चव्हाण पोशि समाधान वाजे पोशि स्वप्नील जुंद्रे पोशि विशाल कुंवर पोशि महेश खांडबहाले पोशि तेजस मते पोशि सोमनाथ जाधव अशांनी यांनी केली आहे.