मंगळसूत्र हिसकावणाऱ्या टोळक्यांच्या शोधात नाशिक पोलिसांची कंबर कसली

उपनगर पोलिसांची मंगळसूत्र चोरांवर कारवाई : शोधमोहीम तीव्र

लाल दिवा-नाशिक,५:- (प्रतिनिधी) : उपनगर जेलरोड परिसरात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दोन दुचाकीस्वार फरार झाल्याची घटना घडल्यानंतर नाशिक शहर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी कंबर कसली आहे.

गुरुवारी सायंकाळी ६:५० च्या सुमारास जेलरोडवरील एम.एस.ई.बी. कॉलनी येथील रहिवासी श्रीमती मधुरा मिलिंद करकरे (वय ५८) यांच्यावर ही घटना घडली. त्यांच्या गळ्यातील ७५,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र क्रमांक ३९१७ च्या दुचाकीवरील दोन अज्ञात इसमांनी हिसकावले. 

घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भडे यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली असून शहरातील गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या संशयितांकडे पोलीस चौकशी करीत आहेत. 

पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून परिसरातील दुकाने आणि घरांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. श्रीमती करकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचे स्केचेस तयार करण्यात येत आहेत. पोलीस नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत आहेत. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास पोलीसांनी व्यक्त केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!