अंमली पदार्थाची विक्री करणारे सराईत गुन्हेगार ताब्यात अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हेशाखेची कारवाई…!
लाल दिवा -नाशिक,दि.१८: नाशिक : मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालय हददीत चार विशेष पथके स्थापन करून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले होते. त्यापैकी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाईमध्ये सातत्य ठेवुन अंमली पदार्थांची विकी करणारे व्यक्तींची धरपकड करून कारवाया केलेल्या आहेत. त्यामध्ये सन २०२३ मध्ये अंमली पदार्थ बाळगणे व खरेदी विक्री संदर्भाने १० गुन्हे व अंमली पदार्थ सेवन करण्याच्या ०५ व शाळा महाविदयालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ विक्री व सेवन करणा-या इसमांवर कोटपा कायदयाअंतर्गत ३५७ केसेस करण्यात आलेल्या आहेत.
सध्या अंमली पदार्थ विरोधी पथक खालील प्रमाणे एम. डी. संदर्भात गुन्हयांचा तपास करत आहे. (एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २०(ब), २२ (क), २९)
अं. कं.पोलीस ठाणे, गुरनं. तारिख नाशिकरोड गुरनं.४२५/२०२३ दि. ०७/०९/२०२३ ०२नाशिकरोड गुरनं. ४६० / २०२३दि.०८/१०/२०२३ मिळाला माल १२.५ ग्रॅम एम.डी. व इतर साहित्या साधनेकि.रु.७१,७००/-४.८७० कि.ग्रॅ. एम.डी. व इतर साहित्य साधनेकिं.रु. ५ कोटी ९४ लाख, ६० हजार ३०० रूपये ०३ इंदिरानगर गुरनं. २६८ / २०२३ दि.०५/१०/२०२३किं.रु. १ लाख ८९ हजार २६० रुपये
- अटक / पाहिजे आरोपी
५४.५ ग्रॅम एम.डी. व इतर साहित्य साधने
१) वसिम रफिक शेख २) नसरिन उर्फ छोटी भाभी
इम्तीयाज शेख
३) समाधान बाबुराव कांबळे (निष्पन्न आरोपी)
१) गणेश संजय शर्मा
२) गोविंदा संजय साबळे ( ३
आतिष उर्फ गुडया शांताराम चौधरी (सर्व अटक )
१) शिवा अंबादास शिंदे
२) संजय उर्फ बंटी काळे
२) सनी अरुण पगारे
३) सुमित अरुण पगारे ४) मनोज उर्फ मन्ना भरत गांगुर्डे
(व इतर तिन आरोपी निष्पन्न )
७ किलो चांदी जप्त करण्यात आलेली आहे.कि.रु. ५ लाख १२ हजार इतर दोन आरोपी निष्पन्ना झालेले आहेत.
३) इम्तीयाज उर्फ राजा उमर शेख (तिघे अटक )
निष्पन्न आरोपीतांपैकी आज रोजी ताब्यात घेतलेले आरोपी
- (१) अर्जुन सुरेश पिवालवरील गुन्हयांमध्ये इतर आरोपी निष्पन्न झाले असुन त्यांचा शोध घेण्यासाठी एकुण सहा तपास पथके कार्यरत आहेत. लवकरच वरील तिन्ही गुन्हयांमध्ये निष्पन्न असलेल्या आरोपीतांना अटक | करण्यात येवुन सध्या अटक व निष्पन्न आरोपीतांच्या चौकशी मधुन सदर गुन्हयांच्या मुळा पर्यंत जावुन एकमेंकामध्ये असलेली पुराव्याची शृंखला शोधुन गुन्हयामध्ये सबळ पुरावे हस्तगत करण्यात येत आहेत.
शिंदेपळसे गावात आढळलेल्या ललीत पाटील याच्या एम.डी.च्या अवैध निर्मीती बाबत | देखील तपास करण्यात येत असुन, ललीत पाटील त्याचा भाऊ भुषण पाटील व अभिषेक बलकवडे यांनी त्यांचे व महाड येथील निर्मीती कारखान्यावर छापा पडल्यानंतर नाशिक येथे एम.डी.ची निर्मीती करून पुणे, मुंबई या ठिकाणी विक्रीचे रॅकेट चालविले होते. त्या अनुषंगाने साकीनाका मुंबई व पुणे येथे गुन्हे दाखल आहेत.
- ललीत पाटील हा फरार असल्याने त्याचा शोध नाशिक, पुणे व मुंबई पोलीसांकडुन घेण्यात येत होता. दरम्यान नाशिक पोलीसांना माहिती मिळाली होती की, ललीत पाटील याने पुणे येथुन पलायन केल्यानंतर तो नाशिक येथे येवुन गेला होता व एका महिलेकडे एक दिवस वास्तव्यास होता. त्या ठिकाणी आर्थीक देवाण-घेवाण झाल्याची गोपनिय संशयास्पद माहिती मिळाली होती.
त्यावरून सदर महिलेचा गुन्हेशाखा युनिट-१ ने शोध घेवुन तिला अंमली पदार्थ विरोधी | पथकाचे ताब्यात दिले. तिच्याकडे ५ लाख, १२ हजार रूपये किंमतीची ७ किलो चांदी मिळुन आली असुन पुढील चौकशीत जबाब नोंदविला असता ललीत पाटील याने चांदी घेवुन न जाता २५ लाख रूपये अशी रोख रक्कम घेवुन गेल्याचे सांगीतले. सदर महिलेस पुढील चौकशीकामी पुणे पोलीसांच्या ताब्यात देण्यात येत आहे.