महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: जनमतचा कौल

फडणवीसांची ‘मास्टरस्ट्रोक’, विरोधकांचे धाबे दणाणले

लाल दिवा-मुंबई, २४ नोव्हेंबर २०२४ (पंकज काटे, अ‍ॅडव्होकेट मुंबई हाय कोर्ट, अध्यक्ष पुर्णम सामाजिक विकास सामाजिक प्रतिष्ठान) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि जनतेने आपला कौल दिला आहे. या निकालांवरून राजकीय पक्षांना काही धडे मिळाले असतील, असे दिसते. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट): फूट, जातीय कार्ड खेळणे, आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे पक्षाला मोठा फटका बसला आहे. वेळीच नेतृत्व बदल न करणे ही चूक ठळकपणे दिसून येते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्याशी युती करणे, वाचळविरांना आवर घालता न येणे, आणि पक्ष आणि कुटुंब यातील फरक न करता येणे ही कारणे पराभवासाठी कारणीभूत ठरली.

काँग्रेस: नाना पटोले यांचे स्वकेंद्रित राजकारण, हायकमांडने दिलेले अतिमहत्त्व, आणि मान्य नेतृत्वाचा अभाव हे घटक पराभवाचे कारण ठरले. इतरांच्या भांडणात मिळालेले यश टिकणारे नव्हते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट): वेगळी चूल मांडण्याचे धाडस आणि बारामतीत आपले वर्चस्व सिद्ध करण्यात अजित पवार यशस्वी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न दूरच राहिले आहे.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट): टीकेला न जुमानता काम करत राहणे, आपल्याकडे लक्ष केंद्रित करणे, आणि लोकनेता म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले. त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत.

भारतीय जनता पक्ष: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठे यश मिळवले आहे. त्यांच्यावरील टीकेला न जुमानता संयम दाखवून त्यांनी धूर्त राजकारण केले. संघ परिवाराच्या कामालाही या यशात मोठा वाटा आहे. आज महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते फडणवीसच आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना: स्वबळाचा अतिआग्रह आणि ताठर भूमिका यामुळे राज ठाकरे यांना राजकारणात आपली जागा मिळवता आलेली नाही.

सामान्य नागरिकांचा संदेश: या निवडणुकीत सामान्य नागरिकांनी राजकीय पक्षांना काही महत्त्वाचे संदेश दिले आहेत. गृहीत धरणे, जातीय द्वेष, धार्मिक ध्रुवीकरण, आणि भावनिक मुद्दे यांना त्यांनी नकार दिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार करू शकतो, हेही त्यांनी दाखवून दिले आहे.

हे निकाल राजकीय पक्षांसाठी आत्मपरीक्षणाची वेळ आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना आपल्या धोरणांमध्ये बदल करावे लागतील.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!