अंबड एम.आय.डी.सी. चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीतील सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या……. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार कामगिरी…!
लाल दिवा-नाशिक,ता.२१ : एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी हद्दीत घरफोडी करणा-या इसमाची माहिती विश्वासु खब-यामार्फत पो.शिपाई किरण सोनवणे यांना मिळाली. सदर माहितीची
तांत्रिक व मानवी संसाधनाचे आधारे शहानिशा करून कायदेशीर कारवाई करणेकामी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप रामदास पवार, पोना समाधान शिवाजी चव्हाण, पोशि सुरेश रामु जाधव, अर्जुन कारभारी कांदळकर, दिनेश मधुकर नेहे, अनिल नाना कु-हाडे, जनार्दन लक्ष्मण ढाकणे, किरण निवृत्ती सोनवणे यांची टीम तयार करून तपास करण्याच्या सुचना दिल्या.
पोउनि संदीप पवार व पथक यांनी कौशल्यपुर्ण तपास करून यातील आरोपी हा मंचर परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न करून त्यास सदर ठिकाणी जावुन ताब्यात घेतले. नमुद आरोपीकडे कसुन तपास केला असता त्याने एमआयडीसी पोलीस चौकी हद्दीतील मागील सहा महिण्यात तो त्याचे इतर साथिदारासह सात ठिकाणी बंद घर व कंपन्यामध्ये बेकायदेशीर प्रवेश करून एकुण ०५,२२,०००/- रू. किंमतीचे सोने, चांदी व इतर धातुंची चोरी केली. नमुद आरोपीकडुन एकुण ०५,२२,०००/- रू. ( पाच लाख बावीस हजार ) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीकडून उघड करण्यात आलेल्या गुन्हयांची यादी
- १) गुन्हा रजी.नं.७७२/२०२३ भादवी कलम ४५४,४५७,३८० २) गुन्हा रजी.नं.३७१/२०२३ भादवी कलम ४५४,४५७,३८०
- ३) गुन्हा रजी.नं.२८५/२०२३ भादवी कलम ४५४,४५७,३८०
- ४) गुन्हा रजी.नं.३०७/२०२३ भादवी कलम ४५४,४५७,३८०
- ५) गुन्हा रजी.नं.६०२/२०२३ भादवी कलम ४५४,४५७,३८०
- ६) गुन्हा रजी.नं.७७८/२०२३ भादवी कलम ४५४,४५७,३८०
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, नाशिक श्री. संदीप कर्णीक साो, मा. पोलीस उप आयुक्त, (परिमंडळ-२) श्रीमती मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त, (अंबड विभाग) श्री. शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे, पोलीस उप निरीक्षक संदिप रामदास पवार, पोना समाधान शिवाजी चव्हाण, पोशि सुरेश रामु जाधव, अर्जुन कारभारी कांदळकर, दिनेश मधुकर नेहे, अनिल नाना कु-हाडे, जनार्दन लक्ष्मण ढाकणे, किरण निवृत्ती सोनवणे यांनी पार पाडली.