नाशिक रोड ते द्वारका डबल डेकरसाठी पालकमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना प्रत्र..!

लाल दिवा- नाशिक,दि.९ : नाशिक रोड ते द्वारका हा पुणे-नाशिक, राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग असून त्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वाहतुकीसह अवजड वाहतूक होत असते. या विषम वाहतुकीमुळे या 7 किमीवर अंतरावर नेहमीच अपघात आणि गर्दी होते. हे लक्षात घेवून नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून ही कोंडी सोडविण्यासाठी डबल डेकर फ्लायओव्हरची अंतिम मंजुरी तसेच निधी तातडीने मिळून काम सुरू होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.

 

द्वारका ते नाशिकरोड याठिकाणी महा-मेट्रोने निओ मेट्रोचा प्रस्ताव तसेच उड्डाणपूलाचा प्रस्ताव NHAI ने दिला आहे त्यामुळे दोन्हींची सांगड घालून डबल डेकर फ्लायओव्हर होणे गरजेचे आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास वाहतूक कोंडी आणि अपघाताचे सत्र थांबणार आहे. द्वारका सर्कलमध्ये सतत गर्दी होत असते, रेल्वेस्टेशन, पुणे तसेच मुंबई – आग्रा हायवेला जोडणारे हे सर्कल असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच उद्भवत असते.

द्वारका ते नाशिकरोड हा भाग भारत सरकारच्या सागरमाला योजनेत समाविष्ट असून , सागरमाला प्रकल्प हा भारत सरकारचा एक व्युहात्मक व ग्राहकाभिमुख प्रकल्प आहे, यामुळे उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेणे अत्यावश्यक आहे. महामेट्रोकडे मेट्रोची अंतिम मंजुरी प्रस्तावित असून डबल डेक्कर पुलाच्या मंजूरी बाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विनंती केली आहे. 

 

नाशिकरोड – द्वारका या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास नाशिककरांची वाहतूक कोंडीची वाताहात थांबणार आहे. नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सक्रिय होत या योजनेसाठी वेळोवेळी NHAI च्या अधिकाऱ्यांशी पालकमंत्री या नात्याने बैठका घेत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!