वाचाळविर संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना नाशिकच्या वतीने जोडे मारो आंदोलन…..!
लाल दिवा : महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे आणि शत्रुबद्दलही संयमाने वागण्या-बोलण्याची संस्कृती आहे. परंतु, खा. संजय राऊत या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम सातत्याने करत आहेत. अत्यंत शिवराळ आणि अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या राऊत यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना थुंकण्याचे कृत्य केले. त्यामुळे समस्त शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली.
महाराष्ट्रातील जनतेकडून, शिवसैनिकांकडून बोलघेवड्या आणि थुंकीबहाद्दर राऊतांचा निषेध केला जातोय. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांचाही त्यांनी अवमान केला आहे. शहाण्याला शब्दाचा मार कळतो आणि पुरतो, पण राऊत हे अती दीडशहाणे आहेत.
संजय राऊत यांच्या या कृत्याच्या निषेधार्थ शिवसेना नाशिक मध्यावृती कार्यालय नाशिक शहर – जिल्ह्याच्या वतीने जोडे मारून जाहीर निषेध केला.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, उप जिल्हाप्रमुख दिगंबर मोगरे, प्रमोद लासुरे, मामा ठाकरे, अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख बाबुराव आढाव, रोशन शिंदे, दिपक मौले, सचिन भोसले, रुपेश पालकर, आंबडास जाधव, किरण फडोळ, शुभम पाटील, योगेश म्हस्के, मंदाकिनीताई जाधव, पूजाताई धुमाळ, आनंद फरताळे, सुधाकर जाधव, कल्पेश कांडेकर, अरुण घुगे, अमोल जोशी, आदित्य सरनाईक, आदित्य बोरस्ते, संदेश लवटे, विशाल खैरनार, आकाश कोकाटे, अमोल जाधव, जॉर्ज वर्षाला, हर्षल शिंदे, शंकर पांगरे, श्रावण पवार, सुमित वाघ, भिवांनद काळे, विशाल साळवे, नितीन देशमुख, सनी पगार, वैभव कुलकर्णी, हरीश साळवे, मिलिंद मोरे रिहान शेख, शशिकांत गावरे आदी शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना, पदाधिकारी उपस्थित होते.