अवैध धंदेवाल्यांचे दणाणले धाबे, अवैध देशी दारू अड्ड्यांवर पोलिसांची धाड दोघांना ठोकळ्या बेड्या…..! दोन अड्डे उध्वस्त…विशेष पथकाची दमदार कामगीरी…!
लाल दिवा-नाशिक,ता.१४:-संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त साो., नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालयात अवैध धंदयाविरुध्द कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे.
त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक रविंद्र दिघे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत नांदुरनाका, नाशिक येथे देशी दारूची विक्री होत असल्याची माहीती मिळाली होती.
पथकातील अधिकारी अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई करणे करीता (दि. १३) मार्च२४ रोजी ५:३० वा. निसर्ग नगर, साई मंदिर, नांदुर नाका, नाशिक येथुन इसम नामे राहुल शामभाऊ वाघ, वय ३२ वर्षे, व्यवसाय- किराणा दुकान, रा. साई मंदिराजवळ, निसर्ग नगर, नांदुर नाका, पंचवटी, नाशिक याने त्याचे ताब्यात देशी दारू व मोबाईल फोन असा एकुण ३२८८०- रू. किंमतीचा प्रोव्हिशन गुन्हयाचा माल विक्री करण्याचे उदद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगतांना मिळुन आला.
तसेच दि. १३/०४/२०२४ रोजी ५:५० वा. बुध्द विहाराच्या पाठीमागे, राजवाडा, नांदुर नाका, नाशिक येथे इसम नामे करण संतोष जगताप वय २१ वर्षे, रा. राजवाडा, बौध्द विहाराच्या पाठीमागे, नांदुर नाका, नाशिक याने त्याचे ताब्यात देशी दारू व मोबाईल फोन असा एकुण २५५८०/- रू. किंमतीचा प्रोव्हिशन गुन्हयाचा माल विक्री करण्याचे उदद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगतांना मिळुन आला. दोन्ही इसमांकडुन देशी दारू व मोबाईल फोन असा एकुण ५८४६०- रू. किंमतीच्या मुद्देमालास ताब्यात घेवुन आडगांव पो. स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त साो. नाशिक शहर, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, साो. गुन्हे, सिताराम कोल्हे सो, सपोआ, गुन्हे, वपोनि. जयराम पायगुडे, अंमली पदार्थ विरोधी पथक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. हेमंत नागरे, पोउनि. मुक्तेश्वर लाड, पोहवा. भरत डंबाळे, पोना. दत्तात्रय चकोर, पोना. रविंद्र दिघे, पोना. योगेश चव्हाण, पोना. विनायक आव्हाड, पोअं. विठ्ठल चव्हाण, पोअं. भरत राऊत यांनी केलेली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1