लोकसभा निवडणूक लढवणार नाही- आमदार डॉ. राहुल आहेर; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न..!

चांदवड -
आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत आमदार डॉ. राहुल आहेर यांची तयारी असल्याचा संदश सर्वत्र जाणीवपूर्वक पसरविला जात असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची स्पष्टोक्ती चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
 
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपातर्फे विद्यमान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर आमदार डॉ. राहुल आहेर हेही लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचा मेसेज समाज माध्यमांमध्ये पसरवून जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. आपण लोकसभा निवडणुकीसाठी कधीही इच्छुक नव्हतो व आताही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केले आहे. चांदवड -देवळा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात अनेक विकासकामे केली असून विकासाचा मोठा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही चांदवड-देवळा मतदार संघातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच विकासाचा रथ पुढे नेणार असल्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पत्रकात म्हटले आहे 
--------
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!