मी कुठल्याही चौकशीला तयार ….नार्को टेस्ट करा अथवा अन्य कुठलीही चौकशी करा मी त्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे….- दादाजी भुसे , पालकमंत्री नाशिक……!

लाल दिवा -नाशिक,दि.१८ : माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत नार्को टेस्ट करा अथवा अन्य कुठलीही चौकशी करा मी त्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे. मी आधीही माझी भूमिका स्पष्ट केली. काल देखील अमली पदार्थ जनजागृती चळवळ संदर्भात बैठक घेऊन येत्या आठ दिवसात पाळेमुळे उखडून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे भविष्यात नाशिक शहरात तुम्हाला मोठ्या प्रमाणात कारवाई दिसेल. अवैध धंदा चालकांना कुठेही आश्रय दिला जाणार नाही. यामुळे विरोधकांनी राजकारण कुठल्या विषयाचे करावे हा देखील प्रश्न आहे. त्यांना जी चौकशी करायची ती करावी मी तयार आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!