नाशिक शहर, अहमदनगर व औरंगाबाद जिल्हयातील तब्बल १९ मोटार सायकल चोरी करणारे चोरटे जेरबंद पंचवटी पोलीस ठाणे, गुरुशोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी..
लाल दिवा -नाशिक,ता.१८ : मा. श्री. अंकुश शिंद सो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमळ १, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर | यांनी नाशिक शहरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंचवटी पोलीस स्टेशन श्री अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि / रोहित केदार व पथक यांना पंचवटी पोलीस ठाणे तसेच पोलीस आयुक्तालयातील मोटर सायकलचे चोरीचे | गुन्हे उपडकीस आणणे बाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या.
दिनांक १४/०९/२०२३ रोजी पहाटे ०३:४५ वा. सुमारास सपोनि / डी. एम. वनवे, पोहवा १२०६ सागर कुलकर्णी, पोना/ २५४ निलेश भोईर, पोना / १६४ दिपक नाईक, पोना ३०१ कैलास शिंदे, पोना / १०२ संदिय मानसाने, पोशि/ २१२८ विष्णु जाधव, पोशि/ २५०७ वैभव परदेशी असे गस्त करीत असतांना एक इसम हा काट्यामारुती चौक पंचवटी नाशिक येथे येणार असल्याचे समजल्याने सदर पथकासह काट्या मारुती चौकाच्या आजुबाजुम मापळा लावून वाचले असता तेथे एक संशयीत इसम हा विना नंबर प्लेटची मोटर सायकल घेवुन जातांना | मिळुन आला त्यास पथकाने थांबविले असता असता तो पळून जावून लागला तेा त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे त्याच्या ताब्यातील मोटर सायकल बाबत विचारले असता त्याने काहीएक माहिती न देता उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने संशय येवुन अधिक तपास केला असता त्याने त्याचे नाव राजु प्रकाश पिंपळे, वय ४० वर्षे, स. बाजीराव गोदकर वस्ती, सनन हॉटेलच्या पुढे, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर असे सांगुन, सदरची मोटर सायकल त्याने त्याचा साथीदार शोधेव गफूर शेख, वय २४ वर्षे, रा. नांदुरमध्मेश्वर रोड वस्ती तामदिंडोरी गाव ता. निफाड, जि. नाशिक यांच्यासह ता. राहता जि. अहमदनगर येथून चोरी केल्याचे समजले. तेव्हा त्याच्याकडे पाशि विष्णु जाधव व संतोष पवार यांनी सखोल चौकशी करून नाशिक शहर व इतरत्र अजुन काही मोटर सायकल चोरी केले आहेत अगर कसे याबाबत माहिती घेतली असता त्याने व त्याचा साथीदार शोधेव शेख यांनी पंचवटी पो | स्टे कडील गुरन ३५२ / २०२३ भादवि ३७९ मधील २ मोटर सायकल तसेच औरंगाबाद, अहमदनगर जिल्हयातुन | वेगवेगळ्या कंपनीच्या मोटर सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा साथीदार शोधेव गफुर शेख, वब – २४ वर्षे, रा. नांदुरमधमेश्वर रोड शेखवरती, तामदिडोरी गाव, ता. निफाड, जि. नाशिक यांचे कडुन त्याचे राहते घराजवळून खालील मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असून दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.