सुनिता सुभाष धनगरच्या घरझडतीत मोठया प्रमाणावर मिळाली रोख रक्कम….!
लाल दिवा-नाशिक : दिनांक ०२/०६/२०२३ रोजी सुनिता सुभाष धनगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण
विभाग, महानगरपालीका, नाशिक यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रु. व नितीन अनिल जोशी, कनिष्ठ लिपीक, शिक्षण विभाग, महानगरपालीका, नाशिक यांनी ५,०००/- रु. लाचेची मागणी करुन ती रक्कम स्विकारतांना त्यांना शिक्षण विभाग, महानगरपालीका, नाशिक पकडण्यात येऊन त्यांचेविरुध्द सरकारवाडा पोलीस स्टेशन गु.र.न. १३५/२०१३ भ्र.प्र. अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील आलोसे सुनिता सुभाष धनगर यांचे राहते घर प्लॅट न. ८, रचीत, सनशाईन, उंटवाडी, नाशिक येथील राहते घराची घरझडती घेतली असता त्यांचे राहते घरात घरझडती दरम्याण पुढीलप्रमाणे जंगम
व स्थावर मालमत्ता मिळूण आल्यात.
१) ८५ लाख रुपयाची रोख रक्कम.
२) ३२ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने,
३) सुनिता धनगर यांचे नावे असलेला मौजे आडगाव, ता. जि. नाशिक येथील गट न. १०८६/१/२ मंजूर ले आउट मधील प्लॉट नं. २१ क्षेत्र २१७.२० चौ. मी. या मालमत्तेची कागदपत्रे. ३) प्लॅट न. ८, रचीत, सनशाईन अपार्टमेंट, उंटवाडी, नाशिक या प्लॅटची कागदपत्रे.
४) आलोसे सुनिता धनगर यांचे नावे असलेला नाशिक येथील प्लॅट नं. ११, अदिनाथ विनास, टिळकवाडी,
नाशिक येथील या मालमत्तेची कागदपत्रे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक शमिष्ठा वालावलकर, पोलीस अधिक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. संदिप घुगे व पो. नि. गायत्री जाधव यांनी केलेली आहे.
सुनिता सुभाष धनगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महानगरपालीका, नाशिक व नितीन अनिल जोशी, कनिष्ठ लिपीक, शिक्षण विभाग, महानगरपालीका, नाशिक यांना पोलीस कोठडी रिमांडसह हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक ०५/०६/२०२३ रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करण्यासाठी लँडलाईन ते लँडलाईन व मोबाईल ते लँडलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरु करण्यात आलेली असून सदर क्रमांकावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणलीसंबंधी व करावयाच्या तक्रारीसंबंधी नागरिकांनी संपर्क साधावा