रेन वॉटर हार्वेस्टिंगची उत्कृष्ट अंमलबजावणी केलेल्या सोसायट्यांना(गृहनिर्माण संस्था) पुरस्कार देणार ….!

गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीच्या बैठकीत निर्णय, कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याचे नियोजन

लाल दिवा, ता. २५ : मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीची बैठक आज दि. २४ एप्रिल रोजी पार पडली. मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. उपायुक्त (गोदावरी संवर्धन कक्ष) डॉ. विजयकुमार मुंढे यांनी प्रास्तविक केले. मनपाकडून प्लॅस्टिक बंदी मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे. ही मोहिम आणखी व्यापक करुन कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी बचत गटांमार्फत वेंडींग मशीन लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या पिशव्यांवर प्लास्टिक बंदीचा मजकूर आणि मनपाचा लोगो असणार आहे. तसेच पर्यावरणपूरक मित्र इमारत आणि पर्यावरणपूरक मित्र सोसायटी(गृहनिर्माण संस्था) (मोस्ट एन्व्हायरमेंट फ्रेन्डली बिल्डिंग/सोसायटी) असे पुरस्कार मनपा देणार आहे. त्यासाठी मनपाच्या वेबसाईटवर गोदावरी संवर्धन कक्ष विभागाच्या लिंकवर माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १५ मेपर्यंत माहिती पाठवायची आहे. स्वच्छ झोपडपट्टी (मोस्ट क्लिन स्लम) अशीही पुरस्कार योजना लवकरच राबिवली जाणार असल्याचे मा. आयुक्तांनी बैठकीत सांगितले. याशिवाय गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण थांबविण्यासाठी विविध मुद्यांवर चर्चा झाली.

 

 *मलशुद्धीकरण प्रकल्प अद्ययावत करणार* 

 

तपोवन, आगरटाकळी, चेहर्डी, पंचक या चार मलशुद्धीकरण केंद्रांची (एसटीपी) अद्ययावत सुधारणा करण्याच्या कामाचे सविस्तर प्रकल्प अहवाल एनआरसीडी (राष्ट्रीय नदी संवर्धन विभाग) यांच्याकडे सादर केले आहेत. त्यांच्याकडून आयआयटी रूरकी यांच्याकडे हे अहवाल तपासणीसाठी दिले आहेत. तपोवन आणि आगरटाकळी या दोन मलशुद्धीकरण केंद्राच्या सुधारणेसाठी शासनाच्या तांत्रिक समितीची मंजुरी मिळाली आहे. केंद्राच्या अमृत २.० योजनेतही ते प्रस्तावित केले आहेत. तसेच मखमलाबाद, कामटवाडा येथे दोन नवीन मलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार असल्याची माहिती मनपाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी यावेळी दिली. तसेच ‘नमामी गोदा’ प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीने मलजल वाहिनीचे (सिव्हर लाईन) ३० टक्के सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. जीआयएस मॅपिंगचे काम सुरु असल्याची माहीती चव्हाणके यांनी दिली.   

या बैठकीला अशासकीय सदस्य राजेश पंडीत, निशिकांत पगारे यांच्यासह उपप्रादेशीक अधिकारी (एमपीसीबी) अमर दुर्गुळ, विभागीय माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, उपायुक्त करुणा डहाळे, शहर अभियंता शिवकुमार वंझारी, स्मार्ट सिटी सीईओ सुमंत मोरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, नगर नियोजन विभाग उपसंचालक हर्षल बाविस्कर, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, संदेश शिंदे, गणेश मैड, राजेंद्र शिंदे, नितीन धामणे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!