उच्चभ्रू वसाहतीत राजकारणीचा डर्टी पिक्चर! कुंटणखाना उघड, नेता बेड्यांमध्ये!
कुंटणखाना प्रकरणी राजकीय नेता अटकेत; उच्चभ्रू इमारतीमध्ये चालवत होता अड्डा
लाल दिवा-नाशिक,दि.८:-छत्रपती संभाजीनगर रोडवरील उच्चभ्रू वस्तीमधील कुंटणखाना एका राजकीय नेत्याचा असल्याचे तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित महिला या नेत्याच्या आशीर्वादाने हा अड्डा चालवत होती. पवन असे या नेत्याचे नाव असून तो एका राजकीय संघटनेचा उत्तर महाराष्ट्र संघटक असल्याची माहिती आहे. आडगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपालेश्वरनगरात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकत संशयित महिला व तिचा एजंट **जफर मन्सुरी** या दोघांना ताब्यात घेतले होते. या कारवाईत दोन युवतींची सुटका करण्यात आली.
आडगाव पोलिसांनी केलेल्या तपासात आणि परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित महिला पवन याच्या सोबत हा अड्डा चालवत असल्याचे समजले. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सचिन खैरनार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.