“सायबर दूत” तुमच्या दारी : नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा उपक्रम…!

लाल दिवा , नाशिक : सध्या राज्यात ऑनलाईन मार्गाने आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अर्थात सायबर गुन्हे याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन तत्परतेने कार्यरत आहेत. या पार्श्भूमीवर राज्यभरात अनेक उपक्रम राबवले जात आहे.

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे यांनी सायबर गुन्ह्यांमध्ये होणाऱ्या वाढीची दखल घेत एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. “सायबर दूत” हा उपक्रम सध्या नाशिक शहरात राबविला जात असून, सध्या हा उपक्रम आपल्या दुसऱ्या टप्प्यात आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात २७ महाविद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण देण्यात आलेले विद्यार्थी हे सायबर दूत म्हणून पोलिसांसोबत सायबर गुन्ह्यांची जनजागृती करत आहेत. ही जनजागृती विविध शाळा, महाविद्यालय, संस्था, कंपनी अशा ठिकाणी केली जात आहे.

इंटरनेट, मोबाईल, ऑनलाईन साधने या माध्यमातून होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामधील पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाची तयारी सुरू आहे.

दुसऱ्या टप्प्यात ५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन सायबर दूत या भूमिकेची अंमलबजावणी करण्यास तयार केले जाणार आहे. तब्बल १००० विद्यार्थ्यांची सायबर दूत फौज तयार करण्यात येणार आहे.

याद्वारे विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यावर रोख घालण्यासाठी उपाययोजना या बाबत अधिकारी साक्षर करतात. प्रशिक्षण देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सायबर दुतचा अधिकृत बॅच देखील देण्यात येत आहे. या सायबर दुतांवर आपलं कॉलेज, राहता परिसर, तसेच समाजात सायबर गुन्ह्यांची जनजागृती करण्याची जबाबदारी आहे. नाशिक सायबर पोलीस ठाण्यातर्फे सायबरदुतांकरिता भविष्यात कॅप्सुल कोर्सेसचे आयोजन करण्यात येणार असून ‘सायबरदूत’ हा उपक्रम या पध्दतीचा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.

गुन्ह्यांमध्ये दैनंदिन पातळीवर मोठे बदल होत आहे. वाढत्या सोशल मीडिया माध्यमांचा वापर, वाढते शहरीकरण, तसेच पाश्चिमात्य संस्कृतीचे आकलन यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा वेळी जनजागृतीचे “सायबर दूत” यासारखे अनोखे उपक्रम नागरिकांमध्ये विश्वास आणि संरक्षण याची भावना अधिक बळकट बनवण्यास उपयुक्त ठरतात.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!