हद्द अंबडची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ची……१,२०,००० रू किमतीच्या दोन चोरीच्या मोटरसायकली जप्त…. युनिट २ चे नागरिकांनी केले कौतुक…!

लाल दिवा-नाशिक,ता. ७ :- आज (दि,७)मार्च 2024 रोजी गुन्हे शाखा कडील नेमणुकीचे पो हवालदार राजेंद्र घुमरे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, संभाजी स्टेडियम चे भिंतीचे कंपाउंड लगत चोरीच्या दोन मोटरसायकली बेवारस लावून ठेवले आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोहवा राजेंद्र घुमरे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, गुलाब सोनार संजय सानप परमेश्वर दराडे अशांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता १) एक बजाज कंपनीची काळा रंगाची पल्सर,२) एक सुझुकी कंपनीची एक्सेस मोपेड गाडी ताब्यात घेऊन खात्री केली असता सदर च्या मोटरसायकली बाबत सरकारवाडा पो ठाणे व मुंबई नाका पो ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे समजले सदरच्या मोटरसायकली जप्ती पंचनामा करून सरकार वाडा, मुंबई नाका पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आल्या आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!