डॉक्टर शहाणे बंधूंनी आपल्या लिखाणात सातत्य ठेवावे – माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप
लाल दिवा – नाशिक, ता:15 – विक्रांत डहाळे (प्रतिनिधी)
डॉ. राजेंद्र आणि डॉ. कृष्णा या शहाणे बंधूंनी आपल्या लिखाणात सातत्य ठेवून अधिकाधिक संदर्भ ग्रंथांचे लिखाण करावे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व गोव्याचे माजी अर्थमंत्री रमाकांतजी खलप यांनी केले.
डॉ राजेंद्र शहाणे, डॉ. कृष्णा शहाणे या शहाणे बंधूंनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई (SNDT) यांच्यासाठी तृतीय वर्ष कला या वर्गाकरिता लिहिलेल्या “पब्लिक फायनान्स” या इंग्रजी माध्यमातील पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.
डॉक्टर शहाणे बंधूंनी लिहिलेला आठव्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते, ते पुढे म्हणाले की “सार्वजनिक आय – व्यय” हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून यावर सर्व राज्याची अथवा राष्ट्राची प्रगती अवलंबून असते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, अन्न व औषध प्रशासन, नाशिक…सहायक आयुक्त (अन्न) मनीष सानप, अविनाश वाळुंजे, सुनील गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुस्तक लिखाणाची पार्श्वभूमी डॉ. राजेंद्र शहाणे यांनी विशद केली, माजी केंद्रीय मंत्री आणि गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांतजी खलप यांचा सत्कार डॉ. कृष्णा शहाणे यांच्या हस्ते करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अविनाश वाळूंजे यांनी केले तर डॉ. ज्योत्स्ना मईड यांनी आभार मानले.
कार्यक्रमास डॉ. राजेन्द्र शहाणे, सौ.विद्या शहाणे, डॉ. ज्योत्स्ना मईड, बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथील प्रोफेसर तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कृष्णा शहाणे, डॉ. सौ. जयश्री शहाणे, प्रीती शहाणे, पार्थ शहाणे, सार्थक शहाणे, श्रद्धा मईड आदींसह शहाणे परिवारातील सदस्य व आप्तेष्ट उपस्थित होते.
*फोटो कॅप्शन*
एस.एन.डी. टी. वुमन्स युनिव्हर्सिटी मुंबई, यांच्या तृतीय वर्ष कला या वर्गासाठी डॉ.राजेंद्र शहाणे आणि डॉ. कृष्णा शहाणे यांनी लिहिलेल्या “पब्लिक फायनान्स” या इंग्रजी माध्यमातील पुस्तकाचे प्रकाशन करताना माजी केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप समेवत ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डॉ. कृष्णा शहाणे, अविनाश वाळुंजे, सुनील गायकवाड आदी.