“सावित्री”ची लेक म्हणुन माझ्या संघर्षाला धार देणारे तुम्हीच माझे “ज्योतिबा”…. आ. सीमा हिरे यांच्याकडून पती महेश हिरे यांना अनोख्या शुभेच्छाचा संदेश !
लाल दिवा : नाशिक पश्चिम च्या आमदार सीमा हिरे यांनी पती महेश गिरी यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा पुढीलप्रमाणे, माझ्या यशात सर्वाधिक वाटा तुमचा असला तरी अपयशात सुद्धा खचून न जाता “लढ” म्हणुन तुम्ही दिलेला आत्मविश्वास हि या यशाची कमान आहे, एखादी स्त्री चाकोरीबाहेर जाऊन समाजाभिमुख विचार मांडत असेल, तिच्या कर्तृत्वाला आपण एक प्रकारे थोपवू शकत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणुन समाजकंटकांकडून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून मानसिक खच्चीकरण केले जाते.. आणि याच संवेदनशील क्षणात आपण माझ्यासोबत रहात मला सांगितले, तुझ्या नेतृत्वाचा, पुरोगामी विचारशैलीचा काही समाजकंटकांना त्रास होईल, पण तु डगमगू नकोस, खंबीरतेने पुढे चालत रहा, तुझे समाजमान्य होईपर्यंत लढत रहा, यासाठी आम्ही कुटुंब आणि मी जीवनसाथी म्हणुन कायम पाठीशी आहोत, हे सांगत सावित्रीची लेक म्हणुन माझ्या संघर्षाला धार देणारे माझे ज्योतिबा, आपणांस उदंड, निरोगी व दैदिप्यमान आयुष्य लाभो हिच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना..!