अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयाकडून गुटखा विक्रेत्यावर धाड….लाखोंचा गुटखा शिंदे पळसे मध्ये जप्त….!
लाल दिवा : मा. मंत्री महोदय श्री धर्मरावबाबा आत्राम साहेब व मा. आयुक्त श्री अभिमन्यु काळे साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन परिमंडळ 4 मध्ये दि. 29.01.2024 रोजी शिंदे पळसे गावामध्ये संजय तुळशीराम झाडे, शिंदे ता. जि. नाशिक येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकली असता सदर ठिकाणी हिरा पानमसाला व इतर 12 प्रकारचे महाराष्ट्रात बंदी असलेले प्रतिबंधित अन्न पदार्थाचा रु.2,56,265/- किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले. सदरचा साठा हा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याकारणाने या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री गोपाल कासार यांनी अनौपचारीक नमुने घेवून ताब्यात घेतला. त्यामुळे या प्रकरणातील विक्रेत्यावर नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम 188, 272, 273 व 328 व अन्न सुरक्षा व मानदे कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे पुरवठादार, उत्पादकापर्यन्त तपास करण्याबाबत फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास नाशिक रोड पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.
सदरची कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) श्री विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री गोपाल कासार, श्रीमती सु. दे. महाजन व श्री अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) श्री सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे.
तरी नागरिकांना विनंती करण्यात येते की, प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणा-या अन्न आस्थापनांची माहिती असल्यास त्यांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा तसेच अन्न व्यावसायिकांना कळविण्यात येते की, त्यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री अथवा साठा करु नये अन्यथा त्यांचेविरुद्ध कारवाई घेण्यात येईल.
(विवेक पाटील)
सह आयुक्त (अन्न) करिता अन्न व औषध प्रशासन, म.राज्य, नाशिक