धारधार हत्यार व कोयता बाळगणारे ०२विधीसंघर्षित बालक ताब्यात ; गुन्हेशाखा युनिट क्रं २ ची कामगिरी….!
लाल दिवा-नाशिक.ता .१७ :- पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, सिताराम कोल्हे, नाशिक शहर यांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने मोहिम सुरू करण्यात आली आहे. गुन्हेशाखा, युनिट क. २ नाशिक शहर कडिल पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-२ ने कारवाई केली आहे.
(दि,१७ ) मार्च २०२४ रोजी पोलीस हवालदार चंदकांत गवळी व महेश खांडबहाले यांना २ विधीसंघर्षित बालक हे कामटवाडागाव, सार्वजनिक शौचालयासमोरील मोकळया गार्डन जवळ त्यांचे कब्जात दोन धारदार कोयते बाळगुन असल्याबाबत मिळालेल्या गोपनिय माहिती वरून सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, सोमनाथ शार्दुल, दशरथ निंबाळकर, विजय वरंदळ, सुनिल आहेर, राजेंद्र घुमरे, पोलीस अंमलदार तेजस मते, महेश खांडबहाले यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेवून त्यांचे कब्जातुन ६००/- रू किमतीचे दोन धारदार कोयते जप्त केले असुन पुढील कारवाई कामी दोन विधी संधर्षित बालक व जप्त मुद्येमाल अंबड पोलिस स्टेशन ला वर्ग केले आहे