नाशिकमध्ये NSS स्वयंसेवकांकडून वाहतूक नियमांची जनजागृती

दिवाळीत सुरक्षित प्रवासासाठी उपायुक्त खांडवी यांचे आवाहन

लाल दिवा-नाशिक, २८ ऑक्टोबर २०२४ – नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम एवं क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या उपक्रमांतर्गत “माय भारत संग दिवाळी” या अभियानाअंतर्गत आज, दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता सीबीएस सिग्नल, नाशिक येथे NSS स्वयंसेवकांकडून वाहतूक नियमांची प्रभावी जनजागृती करण्यात आली. यावेळी स्वयंसेवकांनी पोस्टर्सच्या माध्यमातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले. 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांशी संवाद साधून त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनाही वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी नाशिक शहर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक, नाशिक शहर, श्री सुधाकर सुरुडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक विभाग, नाशिक शहर, श्री दिवाणसिंग वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, युनिट क्रमांक २, श्री हांडे, शहर वाहतूक शाखा, युनिट क्रमांक १, श्री ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेतील इतर अंमलदार यावेळी उपस्थित होते. त्यांनी NSS स्वयंसेवकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना केले.

या उपक्रमामुळे दिवाळीच्या सणादरम्यान होणारे अपघात कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!