दोन हजाराच्या नोटबंदीमुळे करन्सी नोट प्रेस ला मिळणार छप्पर फाडके महसूल..!
लाल दिवा-नाशिक, ता. २४ : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराची नोट छापण्याचे बंद करण्याची घोषणा केल्यानंतर भारताला चलनी नोटांचा पुरवठा करणारी नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेस ला नवीन नोट छापायचे काम मिळणार असल्यामुळे प्रेस च्या महसुलात छप्पर फाडके वाढ होणार आहे. दोन हजाराची नोट बंद झाल्यामुळे दहापासून पाचशेपर्यंतच्या नोटांना बाजारात जास्त मागणी येणार आहे. पर्यायाने नोट छापायचे काम वाढणार आहे डिजिटल करन्सी चे युगात प्रेसचे अस्तित्व टिकून राहिल्यामुळे कामगार ही इष्टापत्ती (नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे) समजत आहे.
दोन हजाराची नोट बंद होणार या बातमीने भारतभर खळबळ उडाली होती. मात्र या नोटा बदलून देण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. दोन हजाराची ही नोट बदलीने नाशिकरोड प्रेसला रिझर्व्ह बँकेकडून जादा काम मिळून प्रेस कामगाराचा फायदाच होणार आहे. देशाच्या महसुलात छप्पर फाडके वाढ होणार असून कामगारांना नोटा छापाईसाठी नवे आव्हान प्राप्त होणार आहे.
मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे व एक हजाराची नोट चलनातून बाद करून दोन हजाराची नोट चलनात आणण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. काळा पैसा बाहेर काढण्याचा निर्णय यशस्वी झाल्याचा दावा सरकारने केला. दोन हजाराच्या नोटा व्यवहारात वापरणे पहिल्यापासून अडचणीचे ठरू लागले होते. रिझर्व्ह बँकेनेही तसा अहवाल सरकारला दिला होता. त्यामुळे दोन हजाराची नोट छपाई बंद करण्याचा निर्णय आता घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलेर जात असले तरी दोन हजाराच्या नोटांची छपाई ही २०१७-१८ पासूनच बंद करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा परत स्वीकारण्याची प्रक्रिया अगोदरच सुरु केली आहे.
रिझर्व्ह बँक नाशिकरोड आणि देवास प्रेसकडून नोटा छापून घेत असते. मात्र बँकेने सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) येथे स्वतःची नोट प्रेस सुरु करुन नाशिकरोड प्रेसशी स्पर्धा सुरु केली. दोन हजाराच्या नोटा बँकेच्या स्वतः च्या प्रेसमध्ये छापण्यात येत होत्या. नाशिकरोड प्रेसला पाच रुपया पासून पाचशे पर्यंतच्या नोटा छपाईचे काम देण्यात आले आहे. हे काम हजार कोटींचे नव्हे तर अब्जावधींचे आहे. नाशिकरोड प्रेसला या वर्षी ५ हजार दोनशे दशलक्ष नोटा छापण्याचे काम मिळाले आहे. याशिवाय नेपाळच्या तीनशे कोटी नोटा छपाईचे काम मिळाले. असून अन्य देशांच्या नोटा छपाईला मिळाव्यात यासाठी प्रेस प्रशासन प्रयत्न करत आहेत. यातून रोजगारात वाढ व्हावी देशाला महसूल मिळावा असा उद्देश आहे..
प्रतिक्रिया
कितीही मोठे काम मिळाले तरी आमचे प्रेस कामगार नेहमीप्रमाणे ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यास सज्ज आहेत. नवीन आव्हान स्वीकारून ते काम वेळेत पूर्ण करून देण्यासाठी कामगार नेहमी एकजुटीने काम करतात.
जगदीश गोडसे मजदूर संघ