अतिक्रमण काढताना वाहनांवर तुफान दगडफेक…
लाल दिवा, ता. २३ : पंचवटी संयुक्त मोहीम राबविण्यात आली. या मोहीम मध्ये नविन नाशिक, सातपुर, पश्चिम, पुर्व विभाग सहभागी होते . गंगेवरील गौरी पटांगण येथील झोपडपट्टी काढण्याचे काम सुरू असताना तेथील महिला वर्गाने गाड्यांवर दगडफेक केली असून त्यात मनोज जोगळेकर सुरक्षा रक्षक , रवि काथवटे, श्रावण शिराळ, शेखर शिंदे,संजय मोर,संजिव सुर्यवंशी,दत्ता अहिरे म.न.पा पोलिस वहान चालक विशाल खाडे यांना मुका मार लागला तसेच लेडीज हवालदार यांच्याशी धक्काबुक्की केली असून पोलिस वहान चालक विशाल खाडे यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या
व पंचवटी अतिक्रमण वहान चालक विशाल पाटील यांच्या वरही दगडफेक केली परंतु सुदैवाने त्यांनी स्वताला व वहानाला वाचवले तेथुन सर्व कर्मचारी पथक पंचवटी पोलिस स्टेशन येथे उपस्थित झाले . पंचवटी अतिक्रमण निरिक्षक गायधनी साहेब व पंचवटी विभागीय अधिकारी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते