दरोडा व खुनाचा प्रयत्न करून दहशत परसरविणा-या बाशी उर्फ शिवम बेहनवाल या गुन्हेगारी टोळीवर…… मोक्का कायदयान्वये शिक्कामोर्तब !

लाल दिवा-नाशिक,ता .१८ : – नाशिक शहरात टोळी बनवुन खुन व खुनाचा प्रयत्न, मालाविरूध्द व शरिराविरूध्द गुन्हे करून दहशत पसरविणारे संघटीत गुन्हेगारांची दहशत संपुष्टात आणण्यासाठी मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई करून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.

 

दिनांक २४/०७/२०२३ रोजी गुन्हयातील आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी व मारहाण करून बळजबरीने फिर्यादीचे खिशात हात घालुन खिशातील पैसे काढुन घेवुन आरोपीतांनी त्यांचे हातातील धारदार शस्त्राने फिर्यादीचे डोक्यावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आरोपीतांनी त्यांचे हातातील धारदार शस्त्राने इतर नागरीकांच्या गाडयांच्या काचा फोडुन नुकसान करून परिसरात दहशत निर्माण केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे गुरनं ३०२/२०२३ भा.दं.वि कलम ३९५, ३०७,३२३, ५०४, ५०६, ४२७ सह शस्त्र अधिनियम ४/२५ व मपोका कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

सदर गुन्हयाचे तपासात गुन्हयातील मुख्य आरोपी व गुन्हेगारी टोळीचा सुत्रधार बाशी उर्फ शिवम उर्फ शुभम हरबिर बेहनवाल वय २३ वर्षे रा. फर्नांडीसवाडी, जयभवानी रोड नाशिक हा गुंड प्रवृत्तीचा असुन त्याने त्याचे साथीदार १) नेम्या उर्फ रोशन रामदास पवार वय २३ वर्षे रा. फ्लॅट नं.१८ बिल्डींग नं.८ निलगिरीबाग, औरंगाबादरोड नाशिक २) अमन सुरज वर्मा वय १९ रा. वंदे मातरम अपार्टमेंट औटेमळा, उपनगर नाशिकरोड नाशिक ३) भैयु उर्फ सत्यम संजित ढेनवाल वय १९ वर्षे रा. एकलहरा रोड, गेट नं. २ हनुमाननगर, नाशिकरोड नाशिक ४) रोहन राठोड उर्फ पियुष शैलेंद्र खोडे वय २० रा. फर्नांडीसवाडी नाशिकरोड नाशिक ५) सुधांशु उर्फ सोनु राजेश बेद वय १९ रा. फर्नांडीसवाडी नाशिकरोड नाशिक ६) मोहिज जावेद शेख वय २० वर्षे रा. विठठल मंदिराजवळ, विहीतगाव नाशिकरोड नाशिक ७) बिडी उर्फ गौरव मुकणे वय २० वर्षे रा. नागझिरा दर्ज्याजवळ, देवळाली गांव नाशिक ८) चिक्या उर्फ मितेश संतोष परदेशी रा. देवळाली कॅम्प नाशिक व पाहिजे

 

असलेले दोन आरोपी यांनी उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, अंबड, गंगापुर इ. पोलीस ठाणे हददीत लोकांना अवैधरित्या शस्त्र बाळगुन धमकावुन मारहाण करणे, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे,

 

गंभीर दुखापत करणे, दरोडा टाकुन लोकांची लुटमार मारणे, जबरी चोरी करणे, जबरी चोरी करतांना दुखापत करणे, घरफोडी चोरी, अनाधिकृतपणे प्रवेश करणे, खंडणी मागणे, हप्ते गोळा करुन परिसरात दहशत निर्माण केली होती. सदर टोळीतील सदस्यांविरुध्द विविध पोलीस ठाणे हददीत एकुण २८ गुन्हे गुन्हे दाखल झालेले आहेत.

 

मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सदर गुन्हयातील संघटीत टोळी सदस्यांविरुध्द “महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ ची कलमे समाविष्ट करण्यासाठी नमुद कायदयातील कलम २३ (१) (अ) नुसार परवानगी देवुन सदर गुन्हयाचा तपास श्री आनंदा वाघ, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग, नाशिक शहर यांचेकडे देण्यात आला होता. त्यांनी तपास पुर्ण करून आरोपींविरूध्द सबळ पुरावा प्राप्त करून मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्फत मा. अपर पोलीस महासंचालक (कावसु), म.रा. मुंबई यांना २३(२) प्रमाणे परवानगी मिळण्यासाठी अहवाल सादर केला होता.

 

मा. अपर पोलीस महासंचालक (कावसु), म.रा. मुंबई यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांची पडताळणी करून, आरोपीतांविरुध्द सबळ पुरावा असल्याने गुन्हयातील आरापी नामे

 

१) बाशी उर्फ शिवम उर्फ शुभम हरबिर बेहनवाल वय २३ वर्षे रा. फनांडीसवाडी, जयभवानी रोड नाशिक व त्याचे साथीदार २) नेम्या उर्फ रोशन रामदास पवार वय २३ वर्षे रा. फ्लॅट नं.१८ बिल्डींग नं.८ निलगिरीबाग, औरंगाबादरोड नाशिक ३) अमन सुरज वर्मा वय १९ रा. वंदे मातरम अपार्टमेंट औटेमळा, उपनगर नाशिकरोड नाशिक ४) भैयु उर्फ सत्यम संजित ढेनवाल वय १९ वर्षे रा. एकलहरा रोड, गेट नं.२ हनुमाननगर, नाशिकरोड नाशिक ५) रोहन राठोड उर्फ पियुष शैलेंद्र खोडे वय २० रा. फर्नांडीसवाडी नाशिकरोड नाशिक ६) सुधांशु उर्फ सोनु राजेश बेद वय १९ रा. फर्नांडीसवाडी नाशिकरोड नाशिक ७) मोहिज जावेद शेख वय २० वर्षे रा. विठठल मंदिराजवळ, विहीतगाव नाशिकरोड नाशिक ८) बिडी उर्फ गौरव तुषार मुकणे वय २० वर्षे रा. नागझिरा दर्थ्याजवळ ग्रिनवुड सोसायटी समोर देवळाली कॅम्प नाशिक ९) चिक्या उर्फ मितेश संतोष परदेशी रा. देवळाली कॅम्प नाशिक, १०) शाहिद शौकत सैयद रा. पाटील गॅरेजच्या मागे, देवळालीगाव नाशिकरोड ११) भावेश उर्फ गौरव किरण आव्हाड वय २१ वर्षे रा. सावतामाळी भेळमागे, देवळालीगाव नाशिकरोड नाशिक या आरोपीतांविरूध्द मोक्का कायदयातील कलम २३(२) अन्वये दिनांक १५/०१/२०२४ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी देवुन सदर संघटीत टोळीवर शिक्कामोर्तब केला आहे.

मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी शहरातील जे गुन्हेगार त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीपासुन परावृत्त होणार नाहीत त्यांच्यावर मोक्का, एम.पी.डी.ए., सारख्या ठोस कारवाया सुरूच राहणार असल्याबाबत दाखवुन दिले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!