नाशिकरोड पोलीसांची कारवाई ; मोटारसायकल चोरटयास अटक करून १,लाख ३० हजार रूपये किमतीच्या ०३ मोटारसायकल जप्त….!
लाल दिवा-नाशिक,ता.१८:- नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे दिलीप युवराज सपकाळे वय ५४ वर्षे, रा. अण्णाभाऊ साठेनगर, देवळालीगाव, नाशिकरोड, नाशिक यांची हिरो होन्डा सीडी डॉन मोटारसायकल क्र. एम.एच. १५ बी.एफ. ३३०६ ही जेलरोड पाण्याची टाकी परीसरातून चोरी झालेबाबत गु.र.क ३०/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक १६/०१/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोहवा / ८३० गोसावी हे करत आहेत. या गुन्हयाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. रामदास शेळके यांनी यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि / गणेश शेळके व तपासी अंमलदार यांना नमुद गाडी व आरोपीचा तातडीने शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने गुन्हे शोधपथकामार्फत अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध सुरू होता. दरम्यान गुन्हे शोध पथकाचे पोहवा / ८३० गोसावी यांना गोपनिय बातमीदमार्फत माहिती मिळाली की, इसम नामे रोशन संजय गोधडे वय-२३ वर्षे रा. अश्विनी कॉलनी सामनगाव रोड, नाशिकरोड याने वरील गुन्हयातील नमुद वाहन चोरी केले असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने नाशिकरोड पोस्टे हद्दीत सदर इसमाचा शोध घेत असतांना गुन्हेशोध पथकास नाशिकरोड बस स्टॅन्ड परिसरात तो फिरत असतांना मिळून आल्याने त्यास चौकशी कामी ताब्यात घेवून त्याच्याकडे नमुद गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपीस अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक १९/०१/२०२४ पावेतो पोलीस कोठडी दिली आहे. आरोपीकडे सखोल चौकशी करून एकुण ०३ मोटार सायकल आरोपीकडून जप्त करण्यता आल्या असून त्यांचे वर्णनखालीलप्रमाणे
सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णीक, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ श्रीमती मोनिका राउत, मा. सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, पोहवा /१८०८ विजय टेंमगर, पोहवा / ८३० विष्णु गोसावी, पोशि/१९५० सागर आडणे, पोशि/२३८१ गोकुळ कासार, पोशि/२२६० रोहित शिंदे, पोशि/२०४ अरुण गाडेकर, पोशि/२०७२ मनोहर कोळी, पोशि/५४ नाना पानसरे, पोशि/१५४२ यशराज पोतन, पोशि/२१७१ संतोष पिंगळ, चापोशि/५५४ रानडे अशांनी केली आहे…