दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने बेकायदेशीररित्या कोयता व चाकू बाळगणा-या इसमांना केले हत्यारासह जेरबंद…!
विशेष प्रतिनिधी -विक्रांत डहाळे
लाल दिवा -नाशिक,दि.१०: मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालयात नाशिक शहर हद्दीत अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळणारे इसम / गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याकरीता दरोडा व शस्त्र विरोधी पथक तयार / निर्माण करून कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मा. श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. डॉ. श्री. सिताराम कोल्हे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळणा-या गुन्हेगारांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
दरोडा व शस्त्र विरोधी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण गणेश चव्हाण यांना दि. ०९/१०/२०२३ रोजी गुप्त बातमी मिळाली होती की, पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत हद्दपार व रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम नामे १) प्रविण उर्फ बादल पवन वाघ वय २३ वर्षे, रा. उदय कॉलनी, पोटीदे चाळ, कांतीनगर, मखमलाबादरोड, नाशिक व २) अक्षय विरसिंग वाघेरे वय २३ वर्षे, उदय कॉलनी, पोटींदे चाळ, क्रांतीनगर, मखमलाबादरोड, नाशिक हे गोदापार्क, चिंचबनजवळ, पंचवटी, नाशिक परीसरात हातात धारदार कोयता व चाकु घेवुन दहशत माजवित आहेत. सदरच्या माहीतीवरून दरोडा व शस्त्र विरोधी पथक नाशिक शहर यांनी नमुद दोन्ही आरोपीतांना १ धारदार कोयता व धारदार चाकु यांचेसह सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यांचेजवळ ०१ धारदार कोयता व ०१ धारदार चाकु असे मनाई केलेले शस्त्रे दहशत माजविणेकरीता ताब्यात बाळगतांना मिळुन आल्याने व त्यांनी मा. पोलीस आयुक्त कार्यालयाकडील शस्त्र बंदी मनाई आदेश व हद्दपार आदेशाचे भंग केल्याने त्यांचे विरुध्द पंचवटी पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नाशिक शहर, मा. डॉ. श्री. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधी पथक मधील सपोनि / किरण रोंदळे व पोलीस अंमलदार १ ) पोहवा / विजयकुमार सुर्यवंशी २) पोअं/ महेश खांडबहाले ३) पोअं / प्रविण चव्हाण ४) पोअं / सागर बोधले ५) पोअं/ भरत राउत ६ ) पोअं/ तेजस मते ७) मपोअं / मनीषा सौरभ कांबळे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.