येणाऱ्या काळात नाशिकचा कायापालट होणार- मंत्री भुसे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर “चाय पे चर्चा” कार्यक्रमास पालकमंत्र्यांची उपस्थिती…!
लाल दिवा-नाशिक,दि.९: शहरात आज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आर्किटेक्स आणि इंजिनिअर्स असो., नाशिक आयोजीत ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमास नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे उपस्थित होतो. यावेळी उपस्थित नागरिकांनी शहराच्या विकासाबाबत उहापोह करत चर्चा केली. उपस्थित नागरिकांनी यावेळी सूचना केल्या असून त्यांचे स्वागत असल्याने मंत्री भुसे म्हणाले. भविष्यात देखील नागरिकांनी आपल्या सूचना पालकमंत्री कार्यालयात लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन यावेळी केले.
भुसे पुढे म्हणाले की नाशिक ही कुंभनगरी आहे. कुंभमेळा ही नाशिक करांसाठी पर्वणीच आहे, मात्र शहराचा विकास करण्याची देखील मोठी संधी आणि पर्वणी आहे. येणाऱ्या काळात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराचा कायापालट केला जाईल. चांगल्या सूचनांच्या आधारे आपली वाटचाल विकासाच्या दृष्टीने राहील. शासन आपल्या सोबत आहेच मात्र नागरिकांची देखील जबाबदारी असून नागरिकांनी पुढे यायला हवे. नाशिक मॉडेल म्हणून राज्यात नाशिक नावारूपास येत असल्याचे प्रतिपादन मंत्री भुसे यांनी केले.
शहर विकास करायचा असेल तर विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक्चर तसेच इतरही तज्ञ नागरिकांनी आपला सक्रिय सहभाग घेवून शहराच्या विकासात काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत सूचना केल्या पाहिजेत. कुंभमेळ्याच्या दृष्टीने पुढच्या शंभर वर्षांचा विचार करून काम करावे लागणार आहे. यासाठी प्रत्येकाने आपले म्हणून काम करायला हवे असे देखील यावेळी भुसे म्हणाले.
नाशिक हे येणाऱ्या काळात शैक्षणिक हब म्हणून नावारूपास येणार आहे. ‘क्वालिटी सिटी’च्या माध्यमातून नाशिक परिवर्तनाची कात टाकत आहे. सकारात्मक बदल हे दिशा दर्शक असणार आहे. या कार्यक्रमास आयुक्त करंजकर, नरेंद्रजी भुसे, अजय बोरस्ते, बंटी तिदमे, उदय सांगळे, शिवकुमार वंजारी तसेच शहरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.