क्राईम ब्रँच युनिट २ चे पोलीस अधिकारी अनिल शिंदे यांची दमदार एन्ट्री……३ वर्षांपासुन पोलीसांना गुंगारा देणारा अट्टल सोनसाखळी चोर अखेर मोपेड बाईकसह जाळयात……!

लाल दिवा-नाशिक,ता. २४ : – नाशिक शहर आयुक्तालयात मा. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक साो., मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव सो, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री सिताराम कोल्हे सो यांनी नाशिक शहरात होणा-या चैनस्नॅचिंग गुन्हयाच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच अश्या गुन्हयांमध्ये सामिल असणा-या गुन्हेगारांचा व गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्याबाबत गुन्हेशाखा युनिट-२ ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक. श्री. अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा परमेश्वर दराडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून दि. २५/०१/२०२४ रोजी पोउपनि/संदेश पाडवी, सपोउपनि / यशवंत बेडकोळी, विवेक पाठक, पोहवा / परमेश्वर दराडे, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, नंदकुमार नांदुर्डीकर, विजय वरंदळ अशांनी आरोपी नामे-गिताराम आसाराम रणपिसे, वय. ३२ वर्षे, रा-साठेनगर, गल्ली नं-५, वडाळा गांव, इंदिरानगर, नाशिक यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील इंदिरानगर पो.स्टे. कडील ४ गुन्हे, अंबड पो.स्टे. कडील ०३ गुन्हे, उपनगर पो.स्टे. कडील ०२ गुन्हे, पंचवटी पो.स्टे. ०१ गुन्हा व म्हसरूळ पो.स्टे. ०१ गुन्हा असे एकुण ११ चैनस्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले असुन एकुण १२५ ग्रॅम सोने, ०१ ज्युपिटर कंपनीची मोपेड मोटार सायकल असा एकुण ६,०३,७५०/-रू. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साो, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे/विशा, प्रशांत बच्छाव सो, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे सिताराम कोल्हे सो, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट कं. २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक/अनिल शिंदे, पोउपनि/संदेश पाडवी, सपोउपनि/यशवंत बेडकोळी, विवेक पाठक, पोहवा/परमेश्वर दराडे, सुनिल आहेर चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, नंदकुमार नांदुर्डीकर, राजेंद्र घुमरे, गुलाब सोनार, सुहास क्षिरसागर, विजय वरंदळ, पो. अं. तेजस मते, सोमनाथ जाधव अशांनी केलेली आहे……

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!