आचारसंहिता लागू: लोकप्रतिनिधींसह मान्यवरांचे अंगरक्षक मागे

निवडणूक रणांगण: अंगरक्षक विनाच उतरणार मान्यवर

लाल दिवा-नाशिक,दि.१६ :-

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यानंतर नाशिक शहरातील लोकप्रतिनिधी आणि खाजगी व्यक्तींना पुरविण्यात आलेले अंगरक्षक मागे घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

माहिती नुसार, पोलीस आयुक्त सो., नाशिक शहर यांनी १६ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे. 

हेमंत गोडसे, राहुल ढिकले, समीर भुजबळ यांच्यासह अनेकांचा समावेश:

  • खालील मान्यवरांचे अंगरक्षक मागे घेण्यात आल्याचे वृत्त आहे:
  • १. श्री हेमंत तुकाराम गोडसे (माजी खासदार)
  • २. श्री राहुल उत्तमराव ढिकले (आमदार)
  • ३. श्रीमती देवयानी सुहास फरांदे (आमदार)
  • ४. श्रीमती सीमा महेश हिरे (आमदार)
  • ५. श्री. समीर भुजबळ (माजी खासदार), रा. भूजबळ फार्म, अंबड, नाशिक.
  • ६. श्री. जयवंत पुंडलीक जाधव, (माजी विधानपरिषद सदस्य, नाशिक.)
  • ७. श्री. अजय बोरस्ते, रा. पंडीत कॉलनी, नाशिक
  • ८. श्री.दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस रा.कॉ., रा पंचवटी. नाशिक.
  • ९. श्री. प्रविण तिदमे, नाशिक महानगरप्रमुख, बाहासाहेबांची शिवसेना
  • १०. श्री. मुकेश दिलीप शहाणे, माजी नगरसेवक, भाजपा, नाशिक

सर्व पोलीस स्टेशन प्रभारी, राखीव पोलीस निरीक्षक, मुख्यालय व शाखा प्रमुखांना १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजतापर्यंत अंगरक्षक मागे घेण्याचे आदेश देण्यात आले होते. 

यासंदर्भात पोलीस आयुक्त सो., नाशिक शहर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!