महिलांमध्ये चुरस 13 टक्के मतदान ….!
लाल दिवा –निवासी संपादक भगवान थोरात, नाशिक,ता.११: संपूर्ण नाशिक रोड वासियांचे लक्ष लागलेल्या येथील नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या महिला गटाच्या दोन जागेसाठी आज मतदान शांततेत संपन्न झाले एकूण सुमारे 70 हजार 475 मतदारांपैकी सुमारे 9179 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला म्हणजे किमान एकूण 13.2 टक्के मतदारांनी आपले मतदान केले दिवसभर झालेल्या मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
गेल्या आठ दिवसापासून नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे रणधुमाळी सुरू होती या निवडणुकीत सहकार पॅनल व परिवर्तन पॅनल असे आमने-सामने होते दिनांक 1 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने अवलंबिले जात असल्याचा आरोप करीत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते त्यामुळे सदरच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे 19 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते . महिला गटातून परिवर्तन पॅनलच्या संगीता गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज राहिल्याने महिला गटाच्या दोन जागेसाठी सदरची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली जर निवडणूक बिनविरोध झाली असती तर बँकेचा सुमारे 92 लाख रुपये खर्च वाचला असता.
दरम्यान निवडणूक प्रचाराचे रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सहकार पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यामध्ये सोशल मीडिया द्वारे वृत्तपत्राद्वारे आरोप प्रत्यारोप सुरू होते त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वच सभासदांचे लक्ष लागले होते परिणामी शनिवारी प्रचार संपल्यानंतर रविवारी सुमारे 140 मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले नाशिक रोड परिसरातील देवळाली गाव जेलरोड चेहडी गाव तसेच भगूर नवीन नाशिक सिन्नर व इतर आजूबाजूच्या ग्रामीण भागात मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली सकाळी 11 वाजेपर्यंत अतिशय संत गतीने मतदान सुरू होते या काळात फक्त सुमारे दीड टक्का मतदान झाले होते मात्र त्यानंतर मतदानाचा वेग वाढला व टक्केवारी सुद्धा वाढली होती .
सर्वच मतदान केंद्रावर सहकार पॅनल व परिवर्तन पॅनलचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदानासाठी येणाऱ्या सभासदांना हात जोडून आमच्या पॅनलला मतदान करा असे आवाहन करत होते सहकार पॅनलचे नेते दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांनी शहरातील विविध मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष भेट दिली व कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्याचप्रमाणे परिवर्तन पॅनलचे नेते हेमंत गायकवाड व अशोक सातभाई यांनी हे अनेक मतदान केंद्रावर जाऊन भेट दिली सायंकाळी पाच वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर या निवडणुकीत एकूण सुमारे 9179मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत सहकार् पॅनलच्या उमेदवार कमल आढाव व रंजना बोराडे या प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास पॅनलचे नेते दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांनी व्यक्त केला